काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत निघाला आहे. पिकांवरील किडीचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी ड्रोन च्या वापरराला केंद्र सरकारने काही नियमावली जारी केलेली होती. आता ड्रोन वापराची प्रत्यक्ष गरज असून जानेवारी महिन्यापासून मराठवाडा मधील उस्मानाबाद येथे ड्रोन कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ड्रोन संबंधित कंपन्यांना स्वतः आमदार रणजितसिंह भेटून यासंबंधी चर्चा केली आहे जे की जानेवारी पासून शेतकऱ्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सेंटर ऑफ एक्सलंन्स ची होणार स्थापना...
कृषी क्षेत्राशी लगाव असलेल्या तरुण बांधवांना योग्य प्रशिक्षण भेटावे म्हणून उस्मानाबाद मध्ये एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे तसेच शेतीसाठी ड्रोन हे आधुनिक यंत्र किती महत्वाचे आहे ते सुद्धा समजून सांगितले जाणार आहे. केंद्र सरकारने सुद्धा ड्रोन वापरण्याला परवानगी दिलेली आहे.
ड्रोनचा काय फायदा होणार?
आता कुठंतरी रब्बी हंगामातील पिकांची उगवण झालेली आहे. सुरूवातीच्या अवस्थेमध्ये पिकावर झालेली जी कीड असते ती आपल्या डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाही मात्र आता ड्रोन च्या हाय डेफिनिशन कॅमेरा मुळे या किडीचा प्रादुर्भाव सहज पाहायला भेटणार आहे. किडीवर आळा घालण्यासाठी योग्य ती प्रमाणात औषधे वापरता येणार आहेत आणि ते फक्त ड्रोनमुळे शक्य होत आहे. ड्रोन च्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत औषधे फवारणी होणार आहे. जास्त उंचीवरून फवारणी केल्याने सगळीकडे समान फवारणी होणार आहे.
काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?
ड्रोनचा वापर करून आपण मोठ्या क्षमतेने किटकांवर फवारणी करू शकणार आहे. पिकांची जोपासना तसेच त्यावर काही दुष्परिणाम तरी होणार नाहीत ना याची काळजी कृषी मंत्रालय घेत आहे. पीक फवारणी क्षेत्र, वजनाची मर्यादा किती आहे तसेच फ्लाय क्लीअरन्स, नोंदणी, सुरक्षा विमा अशा हंगामी परिस्थितीचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. ज्यावेळी ड्रोन उडवायचे आहे किंवा खाली घ्यायचे आहे यावेळी सुद्धा काळजी घ्यावी लागते अशी नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे.
Published on: 22 December 2021, 06:08 IST