News

मुंबई: पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) केंद्राद्वारे चालवण्यात येणारी एक शेतकऱ्यांच्या कल्याणाची योजना आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी (Shri Narendra ji Modi) यांची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे नुकताच दहावा हप्ता देशातील जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे, राज्यातील या योजनेसाठी सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी पात्र आहेत त्यांनादेखील या योजनेचा दहावा हफ्ता (Tenth installment of PM Kisan) देण्यात आला आहे. ही योजना अल्पभूधारक गरजू शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे, मात्र या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनेत नुकताच काही दिवसांपूर्वी मोठा घोटाळा उघडकीस आला.

Updated on 06 February, 2022 4:42 PM IST

या योजनेद्वारे अनेक बोगस शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने योजनेतील या बोगस कारभाराला आळा घालता यावा या उद्देशाने एक महत्त्वाचा फेरबदल केल्याचे समोर येत आहे. आता या नवीन नियमानुसार या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकर्‍यांना विना ई-केवायसी (E-KYC) करता पैसे देण्यात आले आहेत. मात्र आता आगामी काही दिवसात या योजनेचा अकरावा हप्ता मिळणार आहे. त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली असेल त्याच शेतकऱ्यांना आता या योजनेचा पैसा मिळणार असल्याचे समजत आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत साइटवर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. योजनेचा अकरावा हप्ता एप्रिल महिन्यात येणार आहे आणि या योजनेच्या पात्र शेतकर्‍यांना 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर आपण 31 मार्चपर्यंत ई-केवायसी केली नाही तर आपणास कदाचित या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते.

अशी करा ई-केवायसी- मित्रांनो ई-केवायसी म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सत्यापित करणे होय. ई-केवायसी केल्यामुळे सदर व्यक्तीची ओळख सत्यापित केली जाते. आपणास या योजनेसाठी ई-केवायसी करायची असेल तर आपणास www.pmkisan.gov.in पीएम किसान चा या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

पीएम किसान की अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres  आपणास या पद्धतीचा मजकूर इंग्रजीत लिहिलेला दिसेल. याचा अर्थ असा की, ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊ शकता किंवा आपण आपल्या मोबाईल द्वारे देखील केवायसी करू शकता. जर आपणास मोबाईल द्वारे ई-केवायसी करायची असेल तर आपला मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा आपणास केवळ सीएससी सेंटरवर जाऊनच ई-केवायसी करता येईल. 

मोबाईल द्वारे ई-केवायसी करण्यासाठी पी एम किसानच्या ऑफिशिअल वेबसाईट वर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे गेल्यानंतर ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करायाचे आहे. पुढे दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड चा तसेच मोबाईल नंबर चा वापर करून आपण ई-केवायसी करू शकता. जर आपला नंबर आधार कार्ड ची लिंक नसेल तर आपणास सीएससी सेंटर वर जाऊन ई-केवायसी करावी लागेल.

English Summary: now do these work then government will give pm kisan 11 th installment
Published on: 06 February 2022, 04:42 IST