Agriculture News: शेतकरी बांधवांच्या (Farmer) मदतीसाठी देशातील केंद्र सरकार (Central Government) तसेच विविध राज्यातील राज्य सरकारे नेहमीचं प्रयत्न करत असतात. मायबाप शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमच नवीन योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत असते. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत असते.
खरं पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांनी शेतीतून अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर सुरू केला आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न मिळाले मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या अंदाधुंद वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट होत गेली शिवाय यामुळे आता शेतकरी बांधवांना अतिशय कमी उत्पादन मिळत आहे आणि मानवी आरोग्यावर देखील यामुळे परिणाम होत आहे.
यामुळे आता केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील राज्य सरकारे शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. याच यादीत आता हरियाणा राज्याचे नाव देखील येत आहे. हरियाणाचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री जेपी दलाल यांनीही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक उत्तम तंत्रज्ञान वापरण्याबाबत सांगितले की, सनातन धर्मात गाईला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.
त्यामुळे गाईची सेवा हे पुण्याचे काम आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून खत आणि इतर अनेक औषधे गोठ्यात तयार केली जातील. असे केल्याने पशुपालकांचे उत्पन्नही वाढेल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल. आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी शनिवारी जनसंपर्क अभियानांतर्गत एका गावात गोशाळेचे उद्घाटन केल्यानंतर जवळच्या गावाला भेट दिली तसेच अनेक ग्रामस्थांच्या समस्याही ऐकून घेतल्या.
शेतकरी बांधवानी पारंपरिक शेती सोडावी
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारची कामे केली जातात. ज्याच्या मदतीने तो आपली पारंपारिक शेती सोडून इतर पिकांमधून आपले उत्पन्न वाढवू शकतो. अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली पारंपारिक शेती सोडून फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यपालन इ. या सर्वांसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना चांगले अनुदानही दिले जाते.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती
शेतकऱ्यांकडे लक्ष वेधून दलाल म्हणाले की, त्यांचे उत्पन्न व रोजगार वाढविण्यासाठी आणि पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था स्थापन करण्यात येणार आहे. निश्चितच राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर गोमूत्र आणि गायीच्या शेनापासून खतांची तसेच औषधांची निर्मिती झाली तर सेंद्रिय शेतीला चालना मिळणार आहे.
Published on: 25 July 2022, 06:05 IST