सध्याचा जर विचार केला तर इंटरनेटमुळे सगळे जग अगदी जवळ आले असून अगदी घरबसल्या तुम्ही ऑनलाईन कुठलीही वस्तू खरेदी करू शकतात. इंटरनेटच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे हे सगळे शक्य झाले असून एकंदरीत जगाचा चेहरामोहराच बदललेला आहे. या सगळ्या बदलत्या परिस्थितीला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात येऊ घातले आहे.
जर आपण आता ऑनलाईन खरेदी विक्रीचा विचार केला तर यामध्ये आता पिकांसाठी आवश्यक असणारी कीटकनाशकांची देखील ऑनलाइन विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा:LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना दिलासा! एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत
कीटकनाशक आता शेतकरी बंधूंना घरबसल्या मिळणार ऑनलाईन पद्धतीने
शासनाच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना अगदी घरी बसून त्याच्यासाठी आवश्यक कीटकनाशक मागवता येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे कीटकनाशकांचे जे काही वाढीव दर असतात त्यावर देखील नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
यासाठी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यासारख्या इ कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून कीटकनाशकांची विक्री होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने कायद्यामध्ये धोरणात्मक बदल केला आहे. ऑनलाइन कीटकनाशकांच्या विक्रीला परवानगी देण्यासाठी केंद्र शासनाला कीटकनाशक नियम 1971 मध्ये सुधारणा करावी लागली आहे.
म्हणजे भारतात कीटकनाशक व्यापारासाठी ज्या कडे परवाना उपलब्ध आहे ते ऑनलाईन पद्धतीने कीटकनाशक विक्री करू शकणार आहे.
नक्की वाचा:आता साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा कीटकनाशक घरगुती करणाऱ्या कंपन्या व कीटकनाशक विक्री संबंधित असलेले व्यवसाय यांना खूप मोठा फायदेशीर ठरणार आहे. तसेच शेतकरी बांधवांना देखील घरपोच कीटकनाशक उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे कीटकनाशकांच्या दरावर नियंत्रण राहणार असून आता शेतकरी बंधूंना कीटकनाशक खरेदीसाठी कुठे जाण्याची आवश्यकता नाही.
अगदी खिशातल्या मोबाईलच्या साह्याने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या इ कॉमर्स साईटच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या कीटकनाशकांची ऑर्डर शेतकरी बंधू आता घरबसल्या घेऊ शकणार आहेत व त्यांना मागवलेली कीटकनाशके अगदी घरपोच मिळणार आहेत. परंतु यामध्ये ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर कोणीही कीटकनाशक विकू शकणार नाही. फक्त ज्यांच्याकडे परवाना आहे असेच विक्रेते कीटकनाशक विकू शकणार आहेत.
नक्की वाचा:सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश! स्वाभिमानीकडून संत्र फेकून सरकारचा निषेध
Published on: 01 December 2022, 02:20 IST