जर शेतीजमिनीची मोजणी करायची असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्यांना अर्ज हा करावाच लागतो आणि त्यानंतर मग शेतजमिनीची मोजणी करता येते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ऍप विषयी सांगणार आहोत ज्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे शेतजमिनीची अगदी सहजरीत्या आणि अचूकपणे मोजणी करू शकता.
सर्वसाधारणपणे शेतजमिनीची मोजणी करताना आपल्याला कागदपत्रे तर लागतात मात्र या ऍपच्या माध्यमातून जर आपणास शेतीची मोजणी करायची असेल तर आपल्याला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. आपण या ऍपच्या माध्यमातून फक्त ५ मिनिटांमध्ये शेतजमिनीची मोजणी करू शकणार आहे. हे ऍप घ्यायचे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मोबाईलमध्ये प्ले-स्टोअर ला जाऊन जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे सर्च करावे आणि नंतर त्याखाली जी दिलेली लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण हे ॲप डाउनलोड करू शकता.
जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपणाला खाली दोन ऑप्शन मिळतील. या दोन पर्यायामधील जो पहिला पर्याय असणार आहे त्या पर्यायचा उपयोग करून आपण आपल्या शेतजमिनीची बांधावर जाऊन तिथून चालत चालत जमिनीला पूर्ण वेढा घालावा जे की या पद्धतीने तुम्ही संपूर्ण मोजणी करू शकता. तर दुसरा पर्याय असा आहे की त्या पर्यायामध्ये तुम्ही गुगल मॅपमध्ये जाऊन तुमच्या जमिनीची जी हद्द आहे ती हद्द सिलेक्ट करून तुम्ही जमिनीची मोजणी करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या हद्दीवरून चालत चालत मोजणी करायची असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायातील जो निळा रंग आहे त्यामधील पर्यायावर क्लिक करावे. नंतर वॉकिंग पर्याय निवडून तो सुरु होईल त्या नंतर तुम्ही जमिनीच्या हद्दीवरून चालत चालत संपूर्ण जमिनीला वेढा घालावा. पूर्ण जमिनीला वेढा घालताच तुमच्या संपूर्ण जमिनीची मोजणी पूर्ण होईल व तुम्हला तुमची जमीन किती एकर किंवा किती हेक्टर आहे ते समजून जाईल.
दुसरा पर्याय म्हणजे गुगल मॅप. जर तुम्हाला गुगल मॅप वरून तुमच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर गुगल मॅप उघडून त्यामध्ये निळ्या रंगाच्या दुसऱ्या पर्यायावर जाऊन जमिनीची पूर्ण हद्द सिलेक्ट करावी जे की तुम्ही याद्वारे तुमच्या संपूर्ण जमिनीची मोजणी करू शकता.
Published on: 04 January 2022, 03:46 IST