News

शेतकरी मित्रांनो भारतात बासमती तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन हे घेतले जाते. भारतातुन अनेक देशात बासमती तांदूळ हा निर्यात देखील केला जातो. यावर्षी देखील बासमती तांदूळ बऱ्यापैकी लावण्यात आला आहे पण ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आणि त्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात 20 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते असा अंदाज लावण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत बासमती तांदळाच्या भावात किलोमागे 20 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Updated on 13 November, 2021 3:39 PM IST

जर असे झाले तर बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन येतील. सध्या 85 रुपये प्रति किलो बासमती तांदळाला भाव मिळत आहे. त्याचबरोबर किरकोळ बाजारात लोकांना बासमती तांदूळ 70 ते 90 रुपये किलोने मिळत आहे. भारतातून जवळपास 150 देशांमध्ये बासमती तांदूळ निर्यात केला जातो. आपल्या देशातील पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये बासमतीची लागवड केली जाते. पश्चिम उत्तर प्रदेशात मेरठ, सहारनपूर, आग्रा, अलीगढ, मुरादाबाद, बरेली या सर्व जिल्ह्यांमध्ये बासमती तांदूळ पिकवला जातो. येथील माती आणि हवामानही बासमती तांदळासाठी अनुकूल आहे.  ह्या राज्यात बासमती लागवड जास्त असल्याचे महत्वाचे कारण म्हणजे तेथे पाण्याची पर्याप्त सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे बासमतीची लागवड हि जास्त आहे.

किती आणि का महागणार बासमती

बासमती हा इतर तांदलापेक्षा सर्वात जास्त खाल्ला जाणारा तांदूळ आहे, याची मागणी हि विदेशात देखील अधिक आहे जवळपास दीडशे देशात बासमती निर्यात केला जातो. पण यावर्षी भातपिकाचे खुप नुकसान झाले आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बासमती भात पिकाचे खुप नुकसान झाले आहे. असा अंदाज बांधला जात आहे की, सुमारे 20 टक्के बासमती पिकांचे नुकसान हे यंदा झाले आहे.

दरवर्षी पश्चिम उत्तर प्रदेशात 4.5 लाख हेक्टर जमिनीवर 16 लाख टन बासमती भाताचे उत्पादन हे होते. त्यापासून जवळपास 10 लाख टन बासमती तांदूळ हा मिळतो. पण या एवढ्या मोठ्या उत्पादनात 20 ते 25 टक्के घट घडून येईल. कारण यावर्षी गंगेला आलेला पूर हा ह्या पिकासाठी काल बनला आहे.

याचाच परिणाम म्हणुन येत्या काही दिवसांत बासमती तांदळाचा भाव 11 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

English Summary: now baasmati rice expensive and get benifit to farmer
Published on: 13 November 2021, 03:39 IST