देशात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो. यामध्ये सध्या आधुनिक बदल होत चालले आहेत. असे असताना आता जनावरांच्या हालचांलीच्या आधारे त्यांची गतिशीलता, आजार आणि इतर बाबींची नोंद घेतली जाणार आहे.
यासाठी कॉलर यंत्रणा लावण्याचे काम लवकरच ‘नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्ड’च्या (एनडीडीबी) विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पातून होईल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यात पशुपालकांना वितरित केलेल्या २ हजार जनावरांमध्ये ही यंत्रणा बसविल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११ हजार जनावरांमध्ये कॉलर बसवले जाणार आहे. या संबंधीचे कंत्राट देखील देण्यात आले आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.
काळ्या हळदीची लागवड आहे फायदेशीर, शेतकरी होईल मालामाल..
दरम्यान, याच तंत्रज्ञानाचा वापर करीत जनावरांच्या दैनंदिन हालचालींना टिपले जाईल. यामुळे उपचार आणि इतर गोष्टी करणे सोप्पे जाईल.
तापमान, हिट डिटेक्शन अशा प्रकारच्या नोंदी यातून घेणे शक्य होईल. परिणामी, जनावरांना कोणताही आजार झाल्यास त्याचे निदान लवकर करता येईल. परिणामी जनावरांचा जीव वाचविणे शक्य होईल. यामुळे हे फायदेशीर आहे.
'काळा मुळा' आरोग्यासाठी फायदेशीर, शेतीतून मिळणार बंपर कमाई, जाणून घ्या सर्व काही
विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या कॉलरसाठी लॉग रेंज एरिया नेटवर्क (लोरा) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याचे काम लवकरच सुरू होईल.
राज्यात कधी आणि कोठे मान्सून दाखल होणार? जाणून घ्या...
उसावरील मर रोगाचे नियंत्रण, जाणून घ्या...
कारल्याची शेती आहे फायदेशीर, जाणून घ्या..
Published on: 06 June 2023, 11:01 IST