शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनींची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ नोंदणी, मुद्रांक व शुल्क विभागाने राज्यभरात कार्यान्वित केली आहे.
यासाठी नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्क अशा दोन हजार रुपयांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ‘सलोखा योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना पुढील दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. योजनेत पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रांत कितीही फरक असला, तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.
आता शेतातील दगडांची अडचण होणार दूर, स्टोन पिकर येणार मदतीला, जाणून घ्या..
कृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस ही योजना लागू नाही, असे नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने सांगितले. पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असावा.
एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी विहित पंचनामा नोंदवहीत करणे आवश्यक. हा पंचनामा नोंदवहीवरून तलाठ्यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना द्यावे.
कमी गुंतवणुकीत सुरु करा लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग, होईल फायदा, जाणून घ्या...
अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी हा पंचनामा दस्तास जोडला पाहिजे. अशा प्रकारे काही अटी देखील देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनो कांदा बीजोत्पादन व्यवस्थापन, जाणून घ्या
सिताफळ देईल बंपर उत्पादन, करा फक्त 'असे' नियोजन
७०० ते १२०० लिटरपर्यंत दूध, 'या' म्हशीच्या जाती ठरत आहेत फायदेशीर
Published on: 21 April 2023, 02:21 IST