News

दिल्ली एनसीआरमध्ये आजपासून दूध महाग झाले आहे. पराग आणि अमूलच्या दरात वाढ केल्यानंतर आता मदर डेअरीनेही दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

Updated on 06 March, 2022 2:31 PM IST

दिल्ली एनसीआरमध्ये आजपासून दूध महाग झाले आहे. पराग आणि अमूलच्या दरात वाढ केल्यानंतर आता मदर डेअरीनेही दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता मदर डेअरीतून एक लिटर दूध घेण्यासाठी दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमूल आणि परागने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली होती. मदर डेअरी दिल्ली-एनसीआरमध्ये दररोज 30 लाख लिटरहून अधिक दूध विकते.

मदर डेअरीचे टोकनाइज्ड दूध, जे आधी ४४ रुपये लिटरने मिळत होते, ते आता ४६ रुपयांना लिटर मिळत आहे. अर्धा लिटर अल्ट्रा प्रीमियम दूध पूर्वी ३१ रुपयांना मिळत होते, आजपासून ते ३२ रुपयांना मिळत आहे. आधी ५७ रुपयांना मिळणारे १ लिटर फुल क्रीम दूध आता ५९ रुपयांना मिळत आहे. पूर्वी ४७ रुपये लिटरला मिळणारे टोन्ड दूध आता ४९ रुपयांना मिळत आहे. दुहेरी टोन्ड दूध, जे आधी 41 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते, ते आता 43 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे.

पूर्वी ४९ रुपये लिटरने मिळणारे गायीचे दूध आता ५१ रुपयांना मिळत आहे. इंधनाचे वाढते दर आणि महागडे पॅकेजिंग यामुळे दुधाचे दर वाढवले ​​जात असल्याचे मदर डेअरीचे म्हणणे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शेतीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे कंपनीचे नुकसान होत होते. मदर डेअरी आपल्या विक्रीतील 75 ते 80 टक्के रक्कम दुधाच्या खरेदीत गुंतवते.

अमूल आणि गोवर्धन या कंपन्यानी 1 मार्चपासून दुधाच्या भाव वाढवले होते. पराग मिल्क फुड्स लिमटेडने गोवर्धन ब्रँन्डच्या गायीच्या दुधाच्यी किंमतीमध्ये दोन रुपये प्रति लीटर वाढ करण्याची घोषणा केली होती. यामध्ये वाढीनंतर गोवर्धन गोल्ड मिल्कची किंमत 48 रुपयांवरून वाढून 50 रुपये झाली आहे. अशा प्रकारे गोवर्धन फ्रेशची किंमत 46 रुपयांपासून 48 रुपयांवर पोहोचली आहे. वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दुधाच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता.

English Summary: Now, after Parag and Amul, Mother Dairy has also increased the price of milk
Published on: 06 March 2022, 02:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)