शेतकऱ्यांची आर्थिक (Financial) स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. शेती (Agriculture) करताना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकार मदत करतच. पण सरकार जमीन खरेदीसाठी देखील आता शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देत आहे. चला तर मग जाणून घेऊयात हा लाभ कोणाला मिळू शकतो.
जमीन खरेदीसाठी काय आहे योजना?
शेतजमीन खरेदी करण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना 100 टक्के अनुदान मिळते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी (Land Purchase Subsidy) राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला आहे. आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे.
हेही वाचा: ऐन दिवाळीत कांदा घेणार उसळी; या कारणांमुळे बाजारात होणार मोठी वाढ
कोणाला मिळणार लाभ?
दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे या मजुरांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. तसेच राहणीमान देखील सुधारेल. त्याचबरोबर मजुरीवर असलेले अवलंबन कमी होईल.
हेही वाचा: लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कोणाला किती मदत? जाणून घ्या!
विधवा व परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे. त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाईल. यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन तसेच 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच 18 ते 60 या वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
हेही वाचा: सरकारकडून स्टार्टअप्सना 10 कोटींपर्यंत मिळणार कर्ज; असा लाभ घ्या
Published on: 13 October 2022, 05:44 IST