राज्य सरकारचे पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी बारामती नगरपालिकेस वकिलांमार्फत वैयक्तीक नोटीस दिली आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. बारामती शहरातील बेकायदा कत्तलखाने पाडून टाकावेत, या मागणीसाठी निवेदन देऊनही कारवाई न हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये असे म्हटले आहे की, पुढील दोन आठवड्यात ही कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नगरपरिषदेचे पालिकेचे मुख्य अभियंता व तहसीलदार यांना अॅड. प्रशांत यादव आणि ज्ञानेश्वर माने यांच्यातर्फे नोटीस पाठविण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. बेकायदेशीर पत्रा शेड ठोकून तेथे जनावरांची कत्तल केली जाते. यामुळे हे बंद करण्यासाठी अनेकदा मागणी केली जात आहे.
मदर डेअरीकडून दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ
तसेच कत्तलीमुळे नागरिक त्रस्त आहेत. नदी पात्रामध्ये मांस, रक्त टाकले जात असून, पर्यावरणाला देखील धोका पोहचत आहे. यामुळे याबाबत तक्रारी आल्या आहेत.
इलेक्ट्रिक कारच्या किमती नवीन वर्षात वाढणार, जाणून घ्या कारण..
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी पत्राशेड सील करण्याचे आदेश दिले होते. परंतु, मागील दरवाजा उघडून अवैधपणे हा व्यवसाय केला जात आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
जानेवारीत कापसाचे भाव वाढणार, शेतकऱ्यांनो थोडा धीर धरा..
ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा
शेतकऱ्यांनो तुम्हाला शेळ्यांच्या 'या' जाती माहिती आहेत का? देतात फायदेशीर उत्पादन..
Published on: 28 December 2022, 10:11 IST