शेतकरी सध्या अडचणीत आला आहे. यामुळे त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आता कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना नोटीस बजावली गेली आहे. अमरावतीमध्य खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या ५७ टक्के वितरण झाले.
यामध्ये राष्ट्रीय व खासगी बँकांचा वाटा कमी आहे. त्यामुळे २० टक्क्यांहून कमी कर्ज वितरण करणाऱ्या सर्व बँकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावतानाच कारवाईचा इशारा जिल्हाधिऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी १ हजार ४५० कोटी पीककर्जाचे उद्दिष्ट निश्चित आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा ८९ टक्के आहे. उर्वरित राष्ट्रीय व खासगी बँकांची कामगिरी समाधानकारक नाही.
शेतकरी पिकांवर फवारत आहेत दारु, कारण ऐकून वाटेल आश्चर्य..
यामुळे त्यात तत्काळ सुधारणा करून येत्या १५ दिवसांत अधिकाधिक कर्जवितरण करून उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन संवेदनशीलता बाळगून त्यांना कर्ज मिळण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे बँका आता नरमाइची भूमिका घेणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना काळजी घ्या! कृषी विभागाकडून सव्वा कोटीचे बोगस बियाणे जप्त
अरबी समुद्रात मॉन्सून दाखल, लवकरच राज्यात दाखल होण्याची शक्यता..
महिंद्राचा हा ट्रॅक्टर सर्वात शक्तिशाली! आधुनिक आणि प्रगत सुविधांनी सुसज्ज
Published on: 06 June 2023, 10:41 IST