News

शेतकरी वर्ग नेहमी संकटात असतो जे की मागील वर्षी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्यात आत्ता निसर्गाच्या चढ उतारामुळे अनेक शेतकरी संकटात आलेले आहेत. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये अगदी खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Updated on 09 September, 2021 11:21 PM IST

शेतकरी वर्ग नेहमी संकटात असतो जे की मागील वर्षी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्यात आत्ता निसर्गाच्या चढ उतारामुळे अनेक शेतकरी संकटात आलेले आहेत. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये अगदी खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पीक विमा कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होतो:

जे की अत्ता जे शेतकरी पीकविमा भरतात ते नुकसानभरपाई ची वाट पाहत आहेत. पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स या ऍप वर संबंधित नुकसान झालेल्या पिकाची तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला त्या ऍपवर जाऊन नोंदणी करणे खूप आवश्यक आहे.खरीप हंगामात सर्वात महत्वाचे पीक म्हणजे सोयाबीन पीक आणि खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीन पिकाचा पेरा होता. ज्यावेळी सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली त्यावेळी च विमा साठी शेतकऱ्यांनी कंपनीला रक्कम दिली. तसेच यामधून नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी यामधून पाठ सुद्धा फिरवली आहे. यामधून पीक विमा कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होतो जे की जवळपास १० हजार कोटी पेक्षा जास्तच फायदा कंपनीला झालेला आहे.

हेही वाचा:सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा जोमाने वाढ

फक्त विमा रक्कम अदा करून नुकसान भरपाई मिळेल असे होणार नाही तर शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई रक्कम पदरात पडायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पिकाचे नुकसान  झाले की त्याच्या ७२ तासाच्या आत तुम्हाला पीक नुकसान संबंधित माहिती क्रॉप इन्शुरन्स या ऍप वर नोंद करावी लागणार आहे.ज्यावेळी तुम्ही नोंद कराल त्यानंतर तुमच्या तक्रार घेऊन पीक विमा कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते तुमच्या शेतात पीक पाहण्यासाठी तुमच्या शेताकडे येणार आणि नंतर तुमच्या खात्यावर रक्कम येणार.

अशी आहे प्रक्रिया:-

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्याच शेतकऱ्यांना फक्त क्रॉप इन्शुरन्स या ऑपवर आपल्या पिकासोबत झालेल्या नुकसान संबंधित माहिती भरता  येणार  आहे.  या  मध्ये  तुम्हाला पिकाचे नाव तसेच पिकाचे क्षेत्र, मालकाचे नाव, गट नंबर आणि पेरा किती क्षेत्रावर होता एवढी सर्व माहिती भरावी लागणार आहे. 

किचकट प्रक्रिया, तालु्क्याला एकच कर्मचारी:-

शेतकरी पीक विमा भारत असल्याने करूनही अधिकारी याकडे पाठ फिरवत आहेत त्यामुळे विमा कंपनीचा तालुक्याला १ कर्मचारी नेमण्यात आलेल्या आहे. एक  कर्मचारी  सर्व  पिके  पाहू शकत नसल्याने या ऑनलाईन पद्धतीचा मार्ग कंपनीने काढलेला आहे. मात्र या तांत्रिक बाबींची माहिती शेतकऱ्यांना नसल्याने या मध्ये माहिती कशा प्रकारे भरायची असा प्रश्न सर्वत्र उपलब्ध झालेला आहे.

गतवर्षीही शेतकऱ्यांचे नुकसानच:-

गतवर्षी खरीप हंगामात अगदी शेवटच्या टप्यात पावसाने अवकृपा केली त्यामुळे अनेक शेतकरी वर्गाने पीक विमा  भरलेला होता  आणि  शेतकरी  मदतीची  वाट  पाहत  बसले  होते.  मात्र शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे कशी माहिती भरायची ते समजले नसल्याने ऑनलाईन पद्धतीने ते माहिती नोंदवू शकले नाहीत आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले परंतु पीक विमा कंपन्या फायद्यात राहिल्या.

English Summary: Not only sound insurance but his alertness and dedication too are most required
Published on: 09 September 2021, 11:21 IST