पुणे: कांदा उत्पादक (Onion grower) शेतकरी यंदा चांगलाच संकटात सापडलेला दिसत आहे. खरीप पिकाचा (Kharip Crop) कांदा बाजारात येण्याच्या तयारीत असताना भाव नसल्यामुळे पाठीमागील कांदा (Onion) तसाच पडून आहे. अजूनही कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (farmers) उन्हाळी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे साठवलेला कांदाही खराब होईला लागला आहे.
निसर्गाने यंदा शेतकऱ्यांची परीक्षाच घेयचं ठरवलेलं दिसत आहे. कारण साठवलेला कांदा मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) वाहून गेल्याची घटना आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील वळती येथे घडली आहे. शेतकऱ्यांनी बाजार वाढेल या आशेने कांदा साठवून ठेवला होता मात्र आता त्यावरही पाणी फेरले आहे.
कांद्याला बाजारात सरासरी ८ ते १० रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा बाजारात पाठवला नाही. अजूनही भाव वाढतील अशी अशा शेतकऱ्यांना आहे. मात्र अजूनही भाव वाढत नसल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. सध्याच्या भावात शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
निसर्गाचा लहरीपणा! अगोदर धो धो पाऊस आणि आता किडींचा प्रादुर्भाव; शेतकरी चारही बाजूनी संकटात
आंबेगाव तालुक्यातील वळती येथील शेतकरी नरहरी श्रीपती शिंदे (Narahari Shripati Shinde) यांचा कांदा मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. गावातील शिंदे मळा येथे नरहरी श्रीपती शिंदे हे शेतकरी राहतात. त्यांच्या घराच्यापाठी मागे ओढ्याच्या पात्रावर सिमेंट बंधारा आहे.
या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे या मुसळधार पावसामुळे सिमेंट बंधाऱ्यातील पाणी ओव्हर फ्लो झाले .ओढ्याच्या पात्राच्या कडेला असलेल्या कांदा बराखीत पाण्याचा लोट शिरला.
बराखीत अंदाजे साडे चारशे ते पाचशे पिशव्या कांदा साठवून ठेवला होता. पाण्याचा लोट मोठा असल्याने बराकीतील कांदे वाहून खाली रस्त्यावर आले. अंदाजे शंभर ते दिडशे पिशव्या कांदा वाहून गेला.
कांद्याला भाव नसतानाही शेतकरी खरीप हंगामामध्ये कांदा लागवडीलाच जास्त भर देत आहेत. त्यामुळे येत्या काळात कांद्याला भाव वाढणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. राज्यातील नाशिक, नगर, सोलापूर, सांगली या जिह्यात अधिकची लागवड होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा अलर्ट जारी
PM Kisan: 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे; पहा तुमचे तर नाव नाही ना?
Published on: 09 September 2022, 11:19 IST