मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रात सर्वदूर अतिवृष्टी झाली होती.यामध्ये सर्व शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते.या नुकसानीला सोलापूर जिल्हा सुद्धा अपवाद नव्हता. झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेली सुमारे 20 कोटी रुपयांची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
ही रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळेल यासाठी शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
या झालेल्या अतिवृष्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट,बार्शी इत्यादी तालुक्यांना मोठा तडाखा बसला होता. यामध्ये पिकांच्या प्रचंड प्रमाणात नुकसान होईल पूर्णतःपिके पाण्याखाली गेली होती. त्यावेळी तातडीने पंचनामे करण्यात आले होते व बाधित झालेल्या 79 हजार 440 शेतकऱ्यांना शासन निकषानुसार 80 कोटी रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रस्ताव पाठवला होता.
त्यानंतर शासनाने पहिल्या टप्प्यात 75 टक्के म्हणजे 60 कोटी रुपये वितरित केले. तेव्हाही प्रशासन या दिरंगाईमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास वेळ लागला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील उरलेली 20 कोटी रुपये मात्र अजूनही मिळालेली नाही. यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. परंतु अद्याप पर्यंत ही रक्कम मिळालेली नाही.
जर पाहायला गेले तर नुकसान झाल्याच्या प्रमाणामध्ये ही मदत अत्यंत तोकडी आहे. जी मदत मिळत आहे तेही वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.यामध्ये बागायतीसाठी हेक्टरी पंधरा हजार तर जिरायती साठी हेक्टरी 10000 फळबागांचे नुकसान साठी हेक्टरी 25 हजारांची मदत देण्यात येत आहे.
(संदर्भ- ॲग्रोवन)
Published on: 17 January 2022, 10:03 IST