News

आजपासून देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प वाचून दाखवत आहेत. असे असताना हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मोठी टीम असते. ही टीम अर्थसंकल्प तयार करताना कुठे असते हे कोणाला माहीत नसते.

Updated on 01 February, 2023 11:51 AM IST

आजपासून देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प वाचून दाखवत आहेत. असे असताना हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मोठी टीम असते. ही टीम अर्थसंकल्प तयार करताना कुठे असते हे कोणाला माहीत नसते.

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी उद्योगांच्या संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून माहिती मागवली जाते. त्यानंतर बजेट तयार होते. बजेटला अंतिम रुप देण्याच्या कालावधीत बजेट तयार करणारे अधिकारी १० दिवस घरी जात नाहीत.

यामुळे बजेट तयार करताना त्याची माहिती गोपनीय ठेवली जाते. बजेट हा गोपनीय असल्यामुळे १० दिवस या अधिकाऱ्यांचा घर आणि जगापासून संपर्क तुटलेला असतो. त्यांच्याकडे मोबाईल देखील नसतो.

शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत! आता गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

हे अधिकारी सरकारच्या नजरकैदेत असतात. बजेट तयार होत असतानना अर्थमंत्र्यांचे विश्वासू अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी असते. यामुळे ज्या ठिकाणी हा अर्थसंकल्प तयार केला जातो, त्याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो.

गाढवीनीच्या दुधातून कमवतायत बक्कळ पैसा, 1 लिटर दुधाची 5 हजारात विक्री

अनेकांना बजेट सादर होण्यापूर्वी काय स्वस्त झाले आणि काय महाग होईल याची उत्सुकता असते. नवीन वर्षासाठी तयार केलेल्या खात्यांमध्ये अनेक नवीन योजना आणि नियमांसह आगामी वर्षातील देशाचा खर्च आणि गुंतवणूक याची माहिती देण्यात येते.

महत्वाच्या बातम्या;
शेतकरी हितासाठी शेतात आणि बाजारातही शेतकरीच पाहिजे
गायीच्या दूध खरेदीची स्पर्धा, राज्यात आजपासून सहकारी, खाजगी डेअऱ्यांकडून दूध दरवाढ
बातमी कामाची! आता रेशीम शेतीसाठी एकरी एक लाखाचे कर्ज मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा

English Summary: not allowed go home 10 days, no contact world, budget prepared...
Published on: 01 February 2023, 11:51 IST