देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधरण पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सरासरीच्या ९८ टक्के पावासाचा अंदाज आहे. यामुध्ये परिस्थितीनुरुप पाच टक्के कमी अधिक स्वरुपात तफावत असेल , दरम्यान महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता अधिक आहे. भारतीय हवामान विभागाने नैर्ऋत्य मॉन्सूनचा जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज शुक्रवारी जाहीर केला.
पॉसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मॉन्सून समाधानकारक राहणार आहे. १९६१ ते २०१० कालावधी देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८८ सेंटीमीटर म्हणजेच ८८० मिलीमीटर आहे. तर सरासरीच्या ९६ टक्के ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधरण मानला जातो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधार पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
गेल्यावर्षी हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात जाहीर अंदाजामध्ये १०० टक्के, तर जुलैमध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्यातील गेल्या वर्षी हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात जाहीर अंदाजामध्ये १०० टक्के तर जुलैमध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्यातील अंदाजामध्ये १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा १०९ टक्के पाऊस पडला होता.
एल - निनो सर्वसामान्य राहणार
विषवृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रात गतवर्षाच्या अखेरच्या टप्प्यातला निना सथिती निर्माण झाली होती. नोव्हेंबर महिन्यात ती सर्वोच्च स्थितीवर पोहोचली होती. मात्र २०२१ च्या सुरुवातीला ला निना स्थिती निवळ्यास सुरुवात झाली आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत जाणार आहे. मात्र मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात महासागराचे तापमान (एल-निनो स्थिती ) सर्वसामान्य राहण्याचे संकेत आहेत, यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही हीच स्थिती नकारात्मक पातळीकडे झुकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कसा राहिल पाऊस
मॉन्सूनच्या दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने राज्यनिहाय पडणाऱ्या संभाव्य पावसाची स्थिती दर्शविणार नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार यंदा महराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Published on: 17 April 2021, 06:49 IST