News

राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आंदोलन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंत्री नबाव मलिक यांना अटक करण्यात आले आहे.

Updated on 25 February, 2022 3:44 PM IST

राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आंदोलन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंत्री नबाव मलिक यांना अटक करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या चार दिवसापासून या मागणीसाठी कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. राजू शेट्टी स्वता याठिकाणी आंदोलन करत आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, गेल्या 4 दिवसापासून दिवसरात्र शेतकरी या ठिकाणी बसून आहेत. पण शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे बघायला राज्यकर्त्यांना वेळ नाही. एका मंत्र्याला अटक केली म्हणून त्याला समर्थन देण्यासाठी सगळे मंत्रीमंडळ रस्त्यावर येते. मात्र रात्री सापाच्या मुंडक्यावर पाय देऊन उसाला पाणी देणारा शेतकरी साप चावल्यावर तडफडून मरतो. म्हणून त्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, या आंदोलनाची चौकशी करायली ना महावितरणचे अधिकारी आले ना, राज्यातील मंत्री आले, असेही ते म्हणाले.

दरम्यान, 22 फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. अद्याप महावितरण किंवा सरकारच्या वतीने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आणि स्वतः राजू शेट्टी याठिकाणी दिवसरात्र बसून आहेत. ते म्हणाले, आमच्या जीवनाचा अंत करणाऱ्या सापाला जर शेतकऱ्याकडून काही इजा झाली तर वन्य विभागाकडून आमच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे साप, तसर, डुक्कर, गवा हे सगळे जंगली प्राणी आहेत. हे सगळे प्राणी सरकारचे लाडके आहेत, त्यांना सरकारचे विशेष संरक्षण आहे, असेही ते म्हणाले.

प्राणी सरकारचे लाडावलेले असल्याने रात्रीचे शेतात येतात. त्यामुळे त्यांचा अवमान न करता ताब्यात घेऊन त्या प्राण्यांना सरकारी कार्यालयात सोडा असे आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले. आपल्या शेतात जर एखादा साप आढळला तर त्याला सन्मानाने सरकारी कार्यालयात सोडा असेही शेट्टी म्हणाले. यामुळे आता विजेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. विजतोडली जात असताना शेतकऱ्यांचे आधीच मोठा नुकसान झाले आहे.

English Summary: no time question farmers, but cabinet road support minister."
Published on: 25 February 2022, 03:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)