News

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरें यांनी लिहिलेल्या शिवचरित्राबाबात खूप मोठे विधान केले आहे. शरद पवार म्हणाले, माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे.

Updated on 23 July, 2022 2:06 PM IST

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरें यांनी लिहिलेल्या शिवचरित्राबाबात खूप मोठे विधान केले आहे. शरद पवार म्हणाले, माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

'शिवचरित्र आणि विचारप्रवाह' या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती, जयसिंगराव पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवचरित्राबाबत हे वक्तव्य केले आहे.

बाप रे बाप! बाजारपेठेत मटनापेक्षा महाग मशरूम; जंगली मशरूमची होतेय चर्चा

बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय Babasaheb Purandare

नाव : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
जन्म : २९ जुलै १९२२
जन्मस्थळ : सासवड ( पुणे )
मृत्यू : १५ नोव्हेंबर २०२१
परिचय : इतिहास संशोधक आणि साहित्यिक
टोपणनाव बाबासाहेब पुरंदरे

Farming Technique: भारीच की रावं! एकाच शेतातून मिळणार फळे, धान्य, भाजीपाला; जाणून घ्या दुप्पट शेतीच्या खास पद्धती

बाबासाहेब पुरंदरें यांचे साहित्य – Babasaheb Purandare Books

राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्याची दौलत, शेलारखिंड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, महाराज, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, शेलारखिंड पन्हाळगड, आग्रा, अशी बाबासाहेब पुरंदरेंची साहित्यसंपदा फार व्यापक आहे. शिवचरित्रावर बाबासाहेबानी जवळजवळ बारा हजारांवर व्याख्यानं देऊन समाज जागृतीचं मोठं कार्य केलं.

7th Pay Commission: अजून फक्त 11 दिवस! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २७ हजार रुपयांची वाढ; मोदी सरकार करणार घोषणा

English Summary: No one did as much injustice to Shivaji Maharaj as Babasaheb Purandare: Sharad Pawar
Published on: 23 July 2022, 02:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)