News

कोरोना काळात कित्येकांचे रोजगार गेले. तर काहींना कमी पगारात काम करणं भाग पडलं. यातूनच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होऊन त्यांचे खच्चीकरण होऊ लागले होते.

Updated on 06 June, 2022 2:42 PM IST

कोरोना काळात कित्येकांचे रोजगार गेले. तर काहींना कमी पगारात काम करणं भाग पडलं. यातूनच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होऊन त्यांचे खच्चीकरण होऊ लागले होते. मात्र अशा परिस्थितीतही बीड जिल्ह्यातील एका तरुणाने यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. आपण इतरांपेक्षा काय वेगळं करू शकतो म्हणजे आपला व्यवसाय चालू राहील असा विचार करत त्याने चक्क मालवाहतूक रिक्षालाच सलूनचे दुकान बनवलं. त्याच्या या नवख्या प्रयोगामुळे जिल्ह्यात सलूनच्या दुकानाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

बीड जिल्ह्यात प्रथमच फिरतं सलून सुरू झालं आहे. कोरोनाकाळात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यातच बीड जिल्ह्यातील विश्वनाथ वाघमारे यांचा सलून व्यवसाय बंद पडला. दुकानाचं भाडं देण्याइतपतही त्यांच्याकडे पैसे नव्हते. शेवटी त्यांना दुकान बंद करावं लागलं. मात्र विश्वनाथ वाघमारे यांनी खचून न जाता काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. त्यातूनच त्यांना फिरत्या सलूनची भन्नाट कल्पना सुचली.

आणि मग काय या मंदीत ही या तरुणाने संधीचे सोनं केलं. एका कॉलवर लग्न समारंभाच्या ठिकाणी तसेच इतर कार्यक्रमाच्या जागी आणि गावागावांमध्ये जाऊन फिरता सलूनचा अनोखा प्रयोग सुरु झाला आणि तो यशस्वी देखील ठरला. कोरोना संपल्यानंतर पुन्हा सगळे व्यवसाय सुरळीत होऊ लागले होते. मात्र विश्वनाथ वाघमारे यांच्याकडे पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच दुकानाचं भाडं व डिपॉझिट देण्यासाठीचे पैसे नव्हते. मग पुन्हा व्यवसाय कसा उभारायचा असा प्रश्न त्यांना पडला. मात्र यावेळीही त्यांनी यातून मार्ग शोधलाच.

त्यांनी भाड्याचा मालवाहतूक टेम्पो भाड्याने घेतला. व त्यात सलूनला लागणारे सर्व साहित्य तसेच सलूनची सर्व अरेंजमेंट त्या मालवाहतूक टेम्पोमध्ये करून घेतले. आणि अशाप्रकारे फिरते सलून सुरु केले. आजच्या परिस्थितीला त्यांना यातून चांगले पैसे मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विश्वनाथ वाघमारे यांचे वडीलदेखील या कामात त्यांना मदत करत आहेत.

आता अवघडच झालं! म्हशीच्या खऱ्या मालकाला शोधण्यासाठी दिले DNA चाचणीचे आदेश

आपल्या मुलाचे खचून न जाता जिद्दीने काम करण्याची तयारी बघून त्यांना फार अभिमान वाटतो. एक वेळ अशी आली होती की,कोणता व्यवसाय करावा आणि तो कसा सुरु करावा याची त्यांना चिंता होती. मात्र आपल्या मुलाच्या कल्पनेमुळे त्यांचा आज सलूनचा व्यवसाय चांगला चालला आहे. चांगले ग्राहक मिळाल्यामुळे आणि फिरत्या सलूनमुळे आमची उपजीविका चांगली चालत असल्याचं काशीनाथ वाघमारे यांनी सांगितलं.

अनेकांचे व्यवसाय गेलेले असताना त्या परिस्थितीशी दोन हात करत स्वतःच्या नव्या कल्पनाशक्तीने व्यवसाय सुरू करून उपजीविकेचे साधन बनवणाऱ्या बीड जिल्ह्यातील विश्वनाथ वाघमारे हे आज सर्वांसाठी प्रेरणेचे स्थान बनले आहे.

महत्वाच्या बातम्या:
कौतुकास्पद: काळ्या आईची सेवा केल्यामुळे शेतकऱ्याला थेट बांधावरच मिळाला पुरस्कार
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; विकास महामंडळाचा मोठा निर्णय

English Summary: No need to sit down for hours now; Beed's famous salon
Published on: 06 June 2022, 02:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)