News

शेतकऱ्यांना अनेकदा वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत असतात. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत.

Updated on 25 April, 2023 12:05 PM IST

शेतकऱ्यांना अनेकदा वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत असतात. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत.

यामुळे मदतीपासून कोणीही वंचीत राहणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि अवर्षण आदी अनेक समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय केले जात असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते.

नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे.

Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

आपले शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मधमाशीपेक्षा ३ पट अधिक मध देते ही मधमाशी, सरकारकडून 85 टक्के अनुदान..

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एकदिवसीय परिषदेत शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विभागांचे सचिव या वेळी उपस्थित होते. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कपिल जाचक यांना केळीरत्न पुरस्कार, अधिक उत्पादन घेतल्याने परिषदेकडून सन्मान..
केळीला 18 रुपये 90 प्रतिकिलो पैशांचा हमीभाव द्या, ठराव मंजूर
या चॉकलेटने जनावरांना दूध देण्याची क्षमता वाढते, जाणून घ्या काय आहे खासियत

English Summary: No need for agriculture officials now, e-panchnama of farmers' losses will be done through drones...
Published on: 25 April 2023, 12:05 IST