परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पंचनामे बाकी आहेत. पंचनामे होऊन पण काही लोकांना मदत मिळाली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल सरकार घेईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे.
हेही वाचा: धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित
कृषिमंत्री अब्दुल सत्तार पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''विरोधी पक्ष या मुद्द्यावर काही बोलत असल्यास बोलू द्या. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याकरिता आम्ही काळजी घेत आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील शेतकरीपुत्र आहेत.
त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळेच साडेचार हजार कोटींची मदत आतापर्यंत राज्यभर केली गेली. अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती घेण्यासाठी पंचनामे सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतवाटपाची प्रक्रिया सुरू होईल,'' असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: PM Kisan : नाराज होऊ नका, फक्त हे काम करा, 30 नोव्हेंबरपर्यंत खात्यात येतील 2000 रुपये
नुकसान भरपाई वाटप नियोजनाविषयी ते म्हणाले, ''नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कामकाजाबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा केलेली आहे. नुकसानग्रस्त भागांना मी स्वतःही भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत.
अतिपावसामुळे हानी झालेल्या भागांची माहिती मुख्यमंत्रीही घेत होते. त्यांनी निराश झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केलेले आहे. चांगली मदत देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा: EPFO पेन्शनधारक सावध! निवृत्तीनंतरचे पैसे काढण्यावर आला हा नवा नियम
Published on: 02 November 2022, 03:23 IST