News

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक चांगला लाभ मिळतो. विशेष म्हणजे नेहमीच चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Updated on 12 September, 2022 4:50 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक चांगला लाभ मिळतो. विशेष म्हणजे नेहमीच चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

नितीन गडकरी म्हणाले, शेती उत्पादन आणि बाजारपेठ याबाबत नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नका. सरकारकडून शेतीमालाला हमीभाव (Guaranteed price agricultural produce) मिळेल आणि मग मालाचे दर वाढतील यावर अवलंबून न राहता उत्पादन वाढीबरोबर बाजारपेठ शोधण्यावरही लक्ष असणे गरजेचे आहे.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच रक्कम गुंतवा; दरवर्षी मिळणार 29 हजार रुपये व्याज

शेतकरी आता उत्पादन (production) वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवून उत्पन्नही वाढवा असा सल्ला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

सायकलिंगमुळे 'या' मोठ्या आजारांचा धोखा होतो कमी; जाणून घ्या फायदे

रासायनिक पद्धतीचा अवलंब करुन पिकवलेला शेतीमाल (Agricultural goods) हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मालाची चवही वेगळीच असते.

काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या मालाला मागणी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेती ही अंमलात आणणे गरजेचे आहे. उत्पादनवाढीच्या नादात शेतीमालाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांना करोडपती बनवणार काळ्या पेरूची शेती; जाणून घ्या सविस्तर
शेतकरी मित्रांनो कापसावरील अळीचा 'असा' करा कायमचा नायनाट; मिळेल भरघोस उत्पन्न
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेवगा, पडवळ, ढोबली मिरचीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा बाजारभाव

English Summary: Nitin Gadkari valuable advice farmers
Published on: 12 September 2022, 04:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)