नवी दिल्ली: आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांनी भेट घेतली. गडकरींच्या उपस्थितीत नगर (Nagar) जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा विखे यांनी घेतला.
यावेळी नगर- मनमाड रस्त्यासाठी पुन्हा एकदा टेंडर प्रक्रिया करून नव्याने निविदा काढण्याचे व येत्या महिन्याभरात नवीन ठेकेदार नेमण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिले. तसेच संपूर्ण रस्त्याचे नव्याने काम सुरू होईपर्यंत रस्त्याच्या मेंटेनन्स साठी १५ कोटींचे टेंडर काढण्याची सूचना देण्यात आली.
हे ही वाचा: ब्रेकिंग! नितीन गडकरींची मोठी घोषणा, शहरातील टोल होणार रद्द, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
नगर- पाथर्डी रस्त्यासाठी ८.४५ कोटी रुपयांच्या वाढीव निधीच्या प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली. यासोबतच नगर - दौंड रस्त्यावरील बेलवंडी येथील रेल्वे ओव्हर ब्रीजच्या कामासाठी अतिरिक्त १६ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
हे ही वाचा: Modern Agriculture: आधुनिक शेतीतून 'हे' गाव करतय लाखोंची कमाई; जाणून घ्या सविस्तर
यावेळी सुरत- हैदराबाद ग्रीनफिल्ड अलाईन्मेंट प्रोजेक्ट मध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २ मीटर कच्चा रस्ता करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आल्या.
हे ही वाचा: शेतकरी बनणार लखपती! हे पीक करणार मालामाल; जाणून घ्या सविस्तर...
Cultivation Of Plants: होय खरंय! फळापासून पानापर्यंत मिळणार भरघोस कमाई; करा 'या' वनस्पतीची लागवड
Published on: 04 August 2022, 04:41 IST