केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी हे त्यांची कामाचे स्टाईल आणि कामे पूर्ण करण्याची पद्धत त्यामुळे सध्या देशात प्रसिद्ध आहेत. रस्तेबांधकाम क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान वापरून नवीन मॉडेल उभे केले आहे व संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचे एक विकसित जाळे निर्माण करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.
याच पार्श्वभूमीवर छोट्या गुंतवणूकदारांसाठी नितीन गडकरी एक नवे मॉडेल आणणार असून या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांना देखील देशातील रस्ते निर्मिती मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
काय आहे नितीन गडकरी यांचे मॉडेल?
नितीन गडकरीनी सांगितले की,गुंतवणुकीसाठी असलेले हे नवीन मॉडेल छोट्या गुंतवणूकदारांना तसेच लघू आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी असून या माध्यमातून रस्ते निर्मितीमध्ये जे काही भांडवल लागते त्याच्या निर्मितीसाठी पुढच्या महिन्यापासून संपर्क केला जाणार आहे.
जे काही देशांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत अशा प्रकल्पांमध्ये छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देणार नव मॉडेल बनवत आहोत असे त्यांनी म्हटले.
नक्की वाचा:Agri News: बंधुंनो! बटाटा दरवाढी मागील 'हे' आहे पश्चिम बंगाल कनेक्शन,वाचा सविस्तर तपशील
तसेच या इनविट्सला शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात येणार असून या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. गरीब तसेच मध्यमवर्गीय लोकांना देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची नामी संधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 7 ते 8 टक्क्यांपर्यंत मासिक रिटर्न देण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा दहा लाख रुपये असणार असून त्यासोबतच गुंतवणुकीवर सात ते आठ टक्क्यांचा रिटर्न सुनिश्चित मिळेल. सुरुवातीच्या काळामध्ये जे काही रस्त्यांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आहे त्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी दिली जाईल अशी देखील त्यांनी स्पष्ट केले.
Published on: 24 August 2022, 02:18 IST