नितीन गडकरी म्हटले म्हणजे आपल्या कामाचा आवाका आणि काम करण्याची पद्धत यासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आहे. एक अभ्यासपूर्ण रीतीने त्यांच्या सगळ्या योजना आणि त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. बऱ्याच क्षेत्रातले आवश्यक ज्ञान त्यांना असल्यामुळे ते बर्याच प्रकारच्या गोष्टी करण्याचा सल्ला देत असतात.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी देशातील साखरेचे अतिउत्पादन हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी समस्या असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले. त्यांनी म्हटले की भारत पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर दरवर्षी 15 लाख कोटी रुपये खर्च करतो.
त्यामुळे ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी कृषी उत्पादने घ्यायला हवी व त्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्रामध्ये विविधता आणण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटले. नितीन गडकरी हे मुंबईमध्ये राष्ट्रीय सहनिर्मिती पुरस्कार 2022 वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
नक्की वाचा:Gadkari Announcement:छोटे गुंतवणूकदार देखील होतील मालामाल,असा आहे नितीन गडकरींचा प्लॅन
शेतकऱ्यांनी ऊर्जा उत्पादक बनावे
आपल्याला माहित आहेच कि,वेगवेगळे तंत्रज्ञान सध्या प्रत्येक क्षेत्रात येऊ घातले आहे व त्या दृष्टिकोनातून या तंत्रज्ञानाचे मदत घेऊन उद्योग क्षेत्राने पर्यायी इंधन आणि ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटले. जवळजवळ आपल्या भारताची 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून कृषी विकास दर मात्र तेरा टक्क्यांपर्यंत आहे.
शेतकरी आणि साखर उद्योग हे आपल्या उद्योग गाडीचे इंजिन असून उसापासून महसूल वाढवण्यासाठी पुढील वाटचाल सहनिर्मिती असावी.
तसेच साखर उद्योगाने साखरेचे उत्पादन कमी केले पाहिजे व त्या बदल्यात जास्तीत जास्त सहउत्पादने व उपउत्पादने घेतली पाहिजेत.
नक्की वाचा:शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी राजू शेट्टी आग्रही, मोदी सरकारकडे केली मोठी मागणी
इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे
जर भारताची साखरेची गरज पाहिली तर यावर्षी ते 280 लाख टन असताना साखरेचे उत्पादन 360 लाख टनांपेक्षा जास्त झाले. या झालेल्या अतिरिक्त उत्पादनाचा उपयोग केला जाईल परंतु इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यामुळे साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल असे देखील त्यांनी म्हटलंय.
इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही खूप उपाय केले असून बायो इथेनॉलवर चालणाऱ्या पावर जनरेटर सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची उद्योगासाठी वेळ असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
तसेच भारतामध्ये फॅक्स इंजिन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी देताना म्हटले की,बजाज,हिरो आणि टीव्हीएस सारख्या बाईक निर्मिती कंपन्यांना आधीच फ्लेक्स इंजिन बनवायला सुरुवात केली आहे.
Published on: 28 August 2022, 10:38 IST