निसर्गाच्या लहरीपणामुळे या हंगामात कोकणातील फळ बागायतदार पुरता मेटाकुटीला आला असल्याचे चित्र आपण सर्वांनीच बघितले आहे. यामुळे आंबा समवेतच काजू व इतर फळबागांचे दारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे फळ बागायतदारांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे अशा आशयाची मागणी भाजपचे दिवंगत नेते नितेश राणे यांनी या वेळी केली.
भाजप आमदार नितेश राणे यांनी फळ बागायतदारांना अनुदान देण्यात यावे या संदर्भात एक लेखी निवेदन देखील राज्याचे कृषिमंत्री व मालेगाव बाह्य चे आमदार दादाजी दगडू भुसे यांच्याकडे केली आहे. राणे यांनी भुसे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील फळ बागायतदार अस्मानी संकटामुळे भरडला जात असून यामुळे त्याची आर्थिक कोंडी होत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कोकणात येत असलेल्या नैसर्गिक संकटांमुळे फळ बागायतदारांचेचं जास्त नुकसान होत आहे. कधी अवकाळी कधी ढगाळ वातावरण यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकणातील फळबागा क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर असून त्यांना आर्थिक मदत दिली नाही तर बागायतदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडेल. गेल्या सहा महिन्यात फळ बागायतदारांनी विशेषता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना केला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे. आंबा काजू इतर फळबागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. यासाठी त्यांनी त्यांच्याजवळ साठवलेला सर्व पैसा खर्च करून टाकला आहे.
तळहाताच्या फोडा प्रमाणे जीव लावलेल्या फळबागा आता ऐन काढणीच्या वेळी वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे जमीनदोस्त होऊ लागल्या आहेत. कोकणातील फळ बागायतदारांची सद्यस्थिती बघता त्यांना वेळीच सावरणे अनिवार्य आहे. कोकणातील कॅनिंग आंब्याची खरेदी सध्या अतिशय कवडीमोल दरात होत आहे त्यामुळे या आंब्याला देखील हमी भाव देण्याची मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे व्यतिरिक्त, देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी देखील देवगड तहसीलदार कार्यालयात निवेदन दाखल केले आहे. या निवेदनात देवगड येथील आंबा बागायतदारांनी त्यांच्या बागांच्या झालेल्या नुकसानीसाठी त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या निवेदनात आंबा बागायतदारांना एक लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, राणेप्रमाणेच या शेतकऱ्यांनी कॅनिंग आंब्याला हमी भाव देण्याची मागणी देखील केली आहे.
त्यामुळे नितेश राणे यांनी आपल्या निवेदनात फळ बागायतदार यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी. या निवेदनात राणे यांनी हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. आता कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे राणे यांच्या या निवेदनावर काय ॲक्शन घेतात हे विशेष बघण्यासारखे असेल.
संबंधित बातम्या:-
मराठवाड्याचा पाण्याचा तंटा मिटणार! कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याकडे वळणार- जयंत पाटिल
मोठी बातमी! राजू शेट्टी यांच्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकमेव आमदाराची हकालपट्टी
Published on: 26 March 2022, 09:01 IST