महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनांतर्गत निकषांमध्ये न बसणाऱ्या नऊ हजार 667 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
या पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठवलेली आहे. या पात्र शेतकऱ्यांच्या मध्ये शासकीय नोकरदार,आयकर दाते तसेच शिक्षक आणि यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे.
आघाडी सरकारने केलेल्या कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज मुक्ती मिळाली होती. त्यावेळी जिल्ह्यातील एक लाख 75 हजार 225 खातेदार शेतकऱ्यांची कर्जखात्याची माहिती कर्जमुक्तीच्या पोर्टल वर अपलोड करण्यात आली होती.
त्यापैकी एक लाख 63 हजार 843 कर्जखात्याना विशिष्ट क्रमांक देण्यात आले होते. कर्ज मुक्ती साठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी शासनाने आयकर विभागाकडे पाठवून पडताळणी केली. या पडताळणी मध्ये शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील नऊ हजार 667 शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. या पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाकडे पाठवण्यात आले आहे. यामध्ये 8442 खातेदार हे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद आहेत तर 240 खातेदार शेतकरी मृत आहेत. आतापर्यंत एक लाख 59 हजार 172 शेतकऱ्यांना 908 कोटी 29 लाख वरील कर्जमाफी झाली आहे.
या योजनेअंतर्गत अपात्रतेचे निकष
- आयकरदाते शेतकरी
- महिन्याला पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असलेले सरकारी अधिकारी, कर्मचारी
- छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी
- आजी, माजी मंत्री,आमदार,खासदार, सहकारी साखर कारखाने,कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँकांचे संचालक तसेच संबंधित संस्थांमध्ये 25 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार घेणारे अधिकारी व 25 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे सेवानिवृत्त या योजनेचा लाभ घेण्याचा अपात्र होते.
(संदर्भ-जळगाव लाईव्ह)
Published on: 03 January 2022, 09:23 IST