भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशात वेगवेगळ्या भागात वातावरणानुसार तसेच इतर बऱ्याच कारणांनी शेतात पिकांचे वेगवेगळे उत्पादन घेतले जातात. त्यातीलच नाशिक जिल्ह्यात भाजीपाला,फळे तसेच अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. मात्र बाजारपेठेत यांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. यावर तोडगा म्हणून 2009 साली नाशिक येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नाशिक विकास पॅकेज मंजूर करण्यात आले होते. आता याबाबत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाऊ नये तसेच त्यांच्या शेतमालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळावा यासाठी नाशिक येथे 'कृषी टर्मिनल मार्केट' उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 'कृषी टर्मिनल मार्केट' प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली होती. हे मार्केट उभारण्यासाठी मौजे पिंप्री सय्यद येथील गट क्र.1654 मधील शासन मालकीच्या एकूण जागेपैकी 100 एकर जमीन हस्तांतरीत करून पुढील कामास सुरुवात करावी असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
'कृषी टर्मिनल मार्केट' ठरणार उद्योग- व्यवसायासाठी फायदेशीर
कृषी मालाला चांगली बाजारपेठ मिळावी या हेतून हे मार्केट उभारण्यात येत आहे. शिवाय कृषी टर्मिनल मार्केटच्या कामात येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आता लवकरच कृषी टर्मिनल मार्केटचे काम सुरु होणार आहे. या मार्केटमुळे फळभाज्या, अन्नधान्य, पोल्ट्री पदार्थ तसेच दुग्धजन्य पदार्थांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच यासाठी अत्याधुनिक पद्धतींचा वापर देखील करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात कच्च्या मालाचे नुकसान टळल्याने याचा उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे.
कृषी टर्मिनल मार्केटमधील सुविधा
या मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स लिलाव पद्धत, कोल्ड स्टोरेज, बँकिंग, टपाल, हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स सारख्या सेवा उपलब्ध असणार आहेत. तसेच यातून भाजीपाला उद्योग तसेच फळ उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे. मार्केटमध्ये 70 टक्के फळे व भाजीपाला, 15 टक्के अन्नधान्य आणि 15 टक्के पोल्ट्री, मांस, दुग्धजन्य पदार्थ यांची हाताळणी अपेक्षित आहे. नाशिकमध्ये उत्पादित कृषी मालाला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी आहे. मात्र सुविधांच्या अभावामुळे निर्यातीवर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. टर्मिनल मार्केटच्या उभारणीतून हा प्रश्न सुटेल. आणि शेतकऱ्यांनादेखील याचा फायदा होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
खत विक्रीमध्ये शेतकऱ्यांची लूट; कृषी विभागाने खत विक्रेत्यांना दिला मोठा दणका
शेतकऱ्यांचा थेट बाजारपेठेशी संबंध
खरंतर बाजारभाव ठरविण्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नसतो. मात्र या कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतकऱ्यांचा सहभाग हा वाढणार असून शेतकरी थेट बाजारपेठेशी जोडले जाणार आहेत. असं झाल्यास मध्यस्ती असलेली साखळी कमी होऊन शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणार आहे. बैठकीत
पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई, पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार ,महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
मोठी घोषणा: केजरीवाल सरकार कृषी क्षेत्राला देणार चालना; जाणून घ्या प्रकल्प
चिंता वाढली! कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; जाणून घ्या आजची आकडेवारी
Published on: 10 June 2022, 10:15 IST