News

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत आहे. कोरोना अवकाळी पावसामुळे त्यांची परिस्थिती खालावली आहे. यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. असे असताना आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात काही निर्णय घेतले असून यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

Updated on 13 March, 2022 10:51 AM IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत आहे. कोरोना अवकाळी पावसामुळे त्यांची परिस्थिती खालावली आहे. यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. असे असताना आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात काही निर्णय घेतले असून यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. सध्या शेतकरी वर्गाच्या समस्या या बऱ्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. तसेच वातावरणीय बदल यामुळे तर शेती करणे फारच जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातच महागाईने देखील शेतकऱ्यांना त्रस्त करण्याचे काम केले आहे.

राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच लागणारी खते व बियाणे तसेच मशागतीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाल्याने तसेच बऱ्याच थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असल्याने आता एक नवीन मार्ग राज्य सरकारने काढला आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अशा आहे. त्यानुसार आता एक एप्रिल पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज मिळणार असून याबाबतचा जिल्हा बँकर्स कमिटीच्या प्रस्तावाला राज्यस्तरीय बँकर्स समितीने मान्यता दिली आहे.

आता राज्य बँक (Crop Loan) नवी मर्यादा जाहीर करणार आहे. सध्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून जर आपण 2001 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विचार केला तर तब्बल 38 हजार 156 शेतकऱ्यांनी विविध कारणामुळे आत्महत्या केली आहे. हा आकडा खूपच मोठा आणि धक्कादायक आहे. यामुळे हे थांबले पाहिजे. आत्महत्यांचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक संकटांमध्ये बँकांकडून कर्ज वसुलीचा तगादा, बँकेकडून वेळेत कर्ज न मिळण्याची समस्या या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराच्या आधार घ्यावा लागतो. यामध्ये शेतकऱ्यांना अचानक अडचण आली की पैसे देणे अवघड होते.

यामुळे यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारने बँकेच्या पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय १ एप्रिलपासून लागू होऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भांडवल उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील पीक उभी करताना शेतकऱ्यांच्या अडचणी काहीशा दूर होणार आहेत.

आता शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याने बँकांची थकबाकी देखील वाढणार नाही आणि त्यासोबत पुढे कर्जमाफीची गरज देखील भासणार नाही असा विश्‍वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. असे असले तरी यामुळे तरी शेतकऱ्यांवर चांगले दिवस येणार का हे लवकरच समजेल यामुळे आता तरी आत्महत्या थांबतील अशी अशा आहे.

English Summary: News work! Now farmers will get interest free crop loan up to 3 lakhs from 1st April.
Published on: 13 March 2022, 10:51 IST