News

सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कांदा रडवताना दिसत आहे. कांद्याचे दर सध्या मोठ्या प्रमाणावर पडलेले दिसत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असले तरी आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी 150 रुपये तर काही ठिकाणी 200 रुपये क्विंटल दराने कांदा विकला जात आहे.

Updated on 17 May, 2022 2:49 PM IST

सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कांदा रडवताना दिसत आहे. कांद्याचे दर सध्या मोठ्या प्रमाणावर पडलेले दिसत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असले तरी आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी 150 रुपये तर काही ठिकाणी 200 रुपये क्विंटल दराने कांदा विकला जात आहे.

असे असताना मात्र बिहार, उत्तर प्रदेशात कांद्याला (Uttar Pradesh ) महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त भाव मिळत आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी 5.61 टक्के कांदा उत्पादन बिहारमध्ये केलं जातं. बिहारमध्ये कांद्याला 1000 ते 1600 रुपये भाव मिळत आहे. तसेच केरळमधील एका बाजारात तर कांद्याला 4500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

बिहारच्या ठाकुरगंज बाजारत 15 मे रोजी किमान 1850 रुपये प्रति क्विंटर दल मिळाला होता. तर 2100 ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमाल दर तिथल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान योग्य दर मिळत नसल्याने सहन करावे लागत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव कांद्याला न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी आहे. तसेच आता पावसाळा सुरु होणार असल्याने कांदा साठवणूक देखील करणे अवघड झाले आहे. यामुळे आता विक्री केली तरी आणि साठवणूक केली तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केरळच्या कोल्लममध्ये कांदा प्रतिक्विंटल किमान 4500 तर कमाल 4600 रुपये दराने कांदा विक्री केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
खतांबाबत शेतकऱ्यांची चिंता मिटली, खरीप हंगाम आढावा बैठकीत अजितदादांचा मोठा निर्णय
'आज आरती केली येणाऱ्या काळात भरणे मामांच्या नावानं शांती करणार'
लवकरचा पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना

English Summary: News work! Farmers in Maharashtra sell onions in Bihar and Kerala.
Published on: 17 May 2022, 02:49 IST