News

सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान खाद योजना सुरू करण्यात आली होती. रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी ही योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातात.

Updated on 09 May, 2022 5:57 PM IST

भारत सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असते. जेणेकरून शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य
मिळेल आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत त्यातीलच एक म्हणजे पीएम किसान खाद योजना

सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान खाद योजना सुरू करण्यात आली होती. रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी ही योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातात. या योजनेत सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी जवळपास 11 हजार रुपयांचे अनुदान देत आहे. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल शिवाय त्यांचे उत्पन्नही दुपटीने वाढू शकेल.


शेतकऱ्यांच्या खात्यात खताची ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता हा 6000 रुपये आणि दुसरा हप्ता 5000 रुपये असा आहे. हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने थेट जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेतल्यास सरकारने खत कंपन्यांना दिलेले अनुदान दिले जाणार नाही. ऑनलाइन पद्धतीमुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळून भ्रष्टाचार संपेल.

Aadhar Card : फक्त 50 रुपयात बनवा PVC आधार कार्ड; कसं बनवणार वाचा 

सरकारच्या या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज भासते. तसेच सर्वप्रथम तुम्ही देशाचे शेतकरी असायला हवे. तसेच

-आधार कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
-मोबाइल नंबर
-बँक खाते
-राशन कार्ड
-शेताची कागदपत्रे इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे.

पीएम खाद योजनेसाठी असा करा अर्ज

-ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम DBT च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
-वेबसाइट उघडल्यानंतर पीएम किसानच्या समोर क्लिक करा.
-क्लिकवर तुम्ही पीएम किसान खाद योजनेच्या ऑनलाइन फॉर्मच्या पेजवर पोहोचाल.
-आता तुमची भाषा निवडा.
-तुम्ही ग्रामीण शेतकरी आहात की शहरी शेतकरी आहात याची माहिती द्या, दोन पर्यायांपैकी एक निवडा. त्यानंतर
-तुमचा आधार क्रमांक टाका.
-तुमचा जिल्हा निवडा आणि नंतर कॅप्चा कोड टाका.
-शेवटी सर्च बटण दाबा.

महत्वाच्या बातम्या:
Aadhar Card : फक्त 50 रुपयात बनवा PVC आधार कार्ड; कसं बनवणार वाचा 
भावा फक्त तूच रे…! 10 गुंठ्यात ब्रॉकोली लागवड केली अन मिळवलं 2 लाखांचे उत्पन्न; वाचा काय होतं नियोजन 

English Summary: News of work: 11 thousand grant for purchase of fertilizers given by the government, take the benefit today
Published on: 09 May 2022, 05:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)