Jalgaon News :
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका एका युवकाने शेतीतील महत्त्वाचं संशोधन केलं आहे. या संशोधनातून पाण्याअभावी पिके २ महिने जगू शकतात, असं संशोधन प्रकाश पवार या युवकाने केले आहे. याबाबतचे संशोधन पेटेंट भारत सरकारच्या जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहेत.
२० वर्षांसाठी एक अधिकारही प्राप्त झाला आहे. 'वॉटर कप टू टॅकल ड्रॉट सिचुएशन' हे संशोधन शेतीसाठी वरदान ठरणार आहे. पवार यांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना एक नवी उम्मेद मिळणार आहे. शेतकरी कुटुंबातील हा तरुण आहे. प्रकाश स्वतः शेतकरी कुटुंबातून येत असल्याने त्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या व्यथा चांगल्यापैकीच माहीती आहेत. हेच कारण आहे की, त्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास पिके तग धरू शकतील असे क्रांतीकारक संशोधन केले आहे.
पिक लागवडीपासून साधारण २ महिने जरी पिकाला पाणी मिळाले नाही तरी पिक तग धरू शकते, असा चत्मकारी फार्मुला या संशोधनात अंमलात आणला गेला आहे. शेतकऱ्यांना नेहमी आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागते. अनेक भागांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याअभावी पिकांची योग्य वाढ न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून प्रकाश पवार यांच्या संशोधनाला यश मिळालं आहे. या संशोधनाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
तंत्रज्ञान हे पूर्णपणे जैविक असल्यामुळे शेतकरी वर्गासाठी हे खूप स्वस्तही असणार आहे. संशोधनाच्या पूर्ण चाचण्या ४० ते ४५ डिग्री सेल्सीअसमध्ये घेतल्या असून सर्व यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. संशोधनामुळे पाऊस न आल्यामुळे होणारे नुकसान पूर्ण पणे टाळता येणार आहे. तसंच नापिकी आणि दुष्काळी स्थितीती होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात मदत होईल, अशी अपेक्षा या शेतकरी तरुणांने व्यक्त केली आहे. या संशोधनामुळे आता पावसाची वाट न बघता लागवड करणे शक्य होईल. अल्पप्रमाणात पाण्याचा वापर करून शेती करणे ही सोपे होईल ,अशी माहिती संशोधक प्रकाश पवार यांनी दिली आहे.
महापुरुषांचे अवमान टाळता येणार असंही संशोधन
लोक पत्रिका बॅनर पिशव्या यांच्यावर देवाचे आणि थोरपुरुषांचे फोटो छापतात. यामुळे कार्यक्रम पत्रिका किंवा पिशवीचा वापर झाल्यानंतर ते कचऱ्यात किंवा अडगळीत फेकून देतात. यामुळे देवांचा आणि महापुरुषांचा अवमान टाळण्यासाठी या तरुणाने कलर चेंगिंग कव्हर टू प्रॉटेक्ट प्रायव्हसी असंही दुसरं संशोधन केलं आहे. हे संशोधन भारतीय संस्कृती तसेच भारतीय व्यक्तीमत्त्वांचे संरक्षण करणारे आहे.
दरम्यान, कलर चेंगिंग कव्हर टू प्रॉटेक्ट प्रायव्हसी या संशोधनात कव्हर हे ऑटोमॅटिकॅली वापरानंतर रंग बदलते. पत्रिका किंवा बॅनर अदृश्य करते. त्यामुळे आपल्या हातून नजर चुकीने किंवा अप्रत्यक्षरित्या थोरपुरुषांची होणारी विटंबना, अवमान टाळता येणार असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे. या शोधामुळे प्रकाश यांना परदेशामधूनही नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. परंतु देशातील शेतकऱ्यांची सेवा आणि मदत करण्यासाठी त्याने उच्च पगाराची नोकरी नाकारली आहे. या संशोधनामुळे प्रकाश पवार यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Published on: 26 September 2023, 12:33 IST