News

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करावी लागते आतापर्यंत या योजनेसाठी नोंदणी करणे हेतू शेतकरी बांधवांना सीएससी सेंटर वर भेट द्यावी लागे. मात्र, आता शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने यामध्ये आमूलाग्र बदल करीत एक विशिष्ट प्रकारचे मोबाईल ॲप डेव्हलप केले आहे यामुळे शेतकरी बांधवांना आता आपल्या मोबाईलद्वारे या योजनेसाठी नोंदणी करता येणे शक्य होणार आहे.

Updated on 18 March, 2022 3:02 PM IST

देशातील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्न करीत असते. मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी 2016 मध्ये पीएम किसान सम्मान निधि योजना कार्यान्वित केली. या वर्षी या योजनेला सहा वर्षे पूर्ण होत आहेत.

या योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळावा या हेतूने केंद्र सरकारने यामध्ये मोठे अमुलाग्र बदल करण्यास प्रारंभ केला आहे. या योजनेसाठी आता केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा दहावा हफ्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे.

केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा आतापर्यंत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेचा अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी केंद्र सरकारने आता गावागावात शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करावी लागते आतापर्यंत या योजनेसाठी नोंदणी करणे हेतू शेतकरी बांधवांना सीएससी सेंटर वर भेट द्यावी लागे. मात्र, आता शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने यामध्ये आमूलाग्र बदल करीत एक विशिष्ट प्रकारचे मोबाईल ॲप डेव्हलप केले आहे यामुळे शेतकरी बांधवांना आता आपल्या मोबाईलद्वारे या योजनेसाठी नोंदणी करता येणे शक्य होणार आहे.

एवढेच नाही या ॲपद्वारे सदर शेतकऱ्याच्या खात्यावरील या योजनेची रक्कम देखील आता बघता येणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारचा मानस आहे की, या योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त घेता यावा तसेच अपात्र शेतकरी या योजनेपासून वंचित केले जावे.

अँप्लिकेशन कस डाउनलोड करायचं 

केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना सहज मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने शासन  नेहमीच वेगवेगळे बदल आत्मसात करीत आहे. या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना अनेकदा हफ्त्याचे पैसे केव्हा आलेत याविषयी माहिती होत नाही त्यामुळे केंद्र शासनाने GOI या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माहिती केंद्राने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे विशेष म्हणजे आतापर्यंत या ॲप्लिकेशनचे 5 मिल्लियन डाऊनलोड झाले आहेत, अर्थात पन्नास लाख लोकांनी या ॲप्लिकेशनला डाऊनलोड केले आहे. मित्रांनो ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर विनाशुल्क उपलब्ध आहे त्यामुळे कुठलाही अँड्रॉइड मोबाईल वापरणारा शेतकरी बांधव हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकतो.

कसा करायचा अर्ज 

केंद्र सरकारचे हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ज्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेसाठी नोंदणी करायची असेल त्यांनी या ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या फार्मर्स रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपला बारा अंकी आधार क्रमांक यामध्ये प्रविष्ट करावा लागणार आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्टचा कोड देखील सांगितलेल्या रकान्यात भरावा लागणार आहे.

एवढं काम केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवरती पीएम किसान योजनेसाठी अर्ज भरावा लागणार आहे. या अर्जात मागितलेली माहिती व्यवस्थितरीत्या भरणे अनिवार्य राहणार आहे. माहिती पूर्ण भरल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करावे लागणार आहे.

फॉर्म सबमिट झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे. शेतकरी मित्रांनो जर आपणास या अँप संदर्भात किंवा पीएम किसान योजना संदर्भात काही अडचण असेल तर आपण 155261 या किंवा 011-24300606 पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता.

संबंधित बातम्या:-

Pm Kisan ची ई-केवायसी करण्यासाठी आता फक्त लागणार हे दोन कागदपत्रे; 'या' दिवशी येणार 2 हजार

कांद्याचा भाव तब्बल दीड हजारांनी घसरला! कांदा उत्पादक शेतकरी सापडला पुन्हा अडचणीत

कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे धाव; खतांच्या किमती वाढतील म्हणून चिंतेत म्हणुन सांगितला 'हा' तोडगा

English Summary: New registration for PM Kisan Yojana can now be done on mobile only; Read detailed
Published on: 18 March 2022, 03:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)