उमराणे( जि. नासिक) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याचे लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उमराणे येथील शेतकरी रणजीत देवरे यांनी आणलेल्या कांद्याला मुहूर्ताचा भाव हा सर्वोच्च पाच हजार 151 रुपये मिळाला.
यावेळी संजय देवरे यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या लाल कांद्याच्या लिलावाच्या शुभारंभप्रसंगी बाजार समितीचे प्रशासक फय्याज मुलानी, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना यांच्यासह कांदा व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते.
यावर्षी लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता नसल्यामुळे लाल कांद्याचे दर तेजीत राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच झालेल्या पावसाने कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे
त्यामुळे आधीच कांद्याची आवक बाजारात कमी आहे. उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याचे जवळपास एक हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. त्यात कमाल भावा 5151 रुपये मिळाला असून किमान भाव अकराशे रुपये इतका मिळाला आहे आणि सरासरी भाव दोन हजार 700 रुपये मिळाला.
कांद्याचे प्रचंड आवक कमी
दरवर्षीचा विचार केला तर अगोदर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाल कांदा बाजारात येतो. त्यामुळे या कांद्याला अधिकचा भाव मिळतो.
परंतु यावर्षी सगळीकडे झालेल्या पावसाने या राज्यांमधील कांदा देखे नाशिकच्या बाजारात येऊ शकला नाही.त्याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा बाजारात आणल्याने त्यांना वाढीव दर मिळेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: 16 October 2021, 03:44 IST