News

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत तसेच राज्य सरकारही त्या बरोबरीने प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु यामधील एक सत्य आहे ते म्हणजे पीक उत्पादनातवाढ होईल तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

Updated on 19 September, 2021 12:45 PM IST

 शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत तसेच राज्य सरकारही त्या बरोबरीने प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु यामधील एक सत्य आहे ते म्हणजे पीक उत्पादनातवाढ होईल तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

यासाठी शेतकऱ्यांना पिकांचे सर्वोत्तम वान उपलब्ध होणे फार गरजेचे असते.वेगवेगळ्या प्रकारचेपिकांचे वाण विकसितकरण्याच्या संदर्भात राज्यातील सर्व अकृ राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे अथक प्रयत्न करताना दिसतात. पिकांवर संशोधनाच्या माध्यमातून वेगवेगळे नवीन सुधारित वाण प्रसारित करीत असतात.जेणेकरूनअशा सुधारित वानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तूर या पिकाचे गोदावरी नावाचे वाण प्रसारित केले आहे.या वाणाबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 तुरीचे गोदावरी वाण

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली गोदावरी नावाचे हे वाण अवघ्या चार महिन्यात परिपक्व होते.आता उपलब्ध असणारे जवळपास सर्वच तुरीचे वाण हे उशिराने परिपक्व होतात व पर्याय आणि त्यांची काढणी उशिरा होत असल्याने रब्बी हंगामामध्ये दुसरी पीक घेण्यास उशीर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. परंतु विद्यापीठाने गोदावरी वाण प्रसारित केल्यामुळे आत्ताच तूरउत्पादक शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये  तूर उत्पादन मिळणार त्यामुळे रब्बी हंगामासाठीशेती मोकळी होऊन इतर पिके घेता येतील. सध्या प्रक्षेत्रावर याचे चांगले परिणाम दिसून आल्यामुळे लवकरच मोठ्या प्रमाणावर हेवान शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

 

गोदावरी वानाचे ठळक वैशिष्ट्ये

  • हे वाण जास्त उत्पादन देणारे आहे म्हणजेच कोरडवाहू परिस्थितीत देखील सरासरी उत्पादन 1950 ते 2450 किलो प्रति हेक्‍टर मिळू शकते
  • अवघ्या 160 ते 165 दिवसात हेवान परिपक्व होते.
  • या वानाचा दाणा सफेद असून 100 दाण्यांचे वजन 11.00 ग्रॅम आहे.
  • पिकाच्या शेवटच्या अवस्थेत येणाऱ्या अवर्षणप्रवणतून सुटका
  • महाराष्ट्राकरिता खरीप हंगामासाठी शिफारस
  • मर आणि वांझरोगास प्रतिबंधात्मक

 

English Summary: new red gram veriety develope by maratwada krushi vidyapith
Published on: 19 September 2021, 12:45 IST