News

नवी दिल्ली- आगामी पाच वर्षात देशात तीन लाख प्राथमिक सहकारी संस्था (पीएसी) स्थापना करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री अमित शाह यांनी केली. राजधानी दिल्लीत तालकटोरा स्टेडिअमवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाला संबोधित करताना शाह बोलत होते. कालबाह्य सहकरी कायदे बदलून देशाच्या नव्या सहकार धोरणाची निर्मिती केली जाणार असल्याचे सूतोवाच शाह यांनी केले.

Updated on 26 September, 2021 11:42 AM IST

नवी दिल्ली-  आगामी पाच वर्षात देशात तीन लाख प्राथमिक सहकारी संस्था (पीएसी) स्थापना करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री अमित शाह यांनी केली. राजधानी दिल्लीत तालकटोरा स्टेडिअमवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाला संबोधित  करताना शाह बोलत होते. कालबाह्य सहकरी कायदे बदलून देशाच्या नव्या सहकार धोरणाची निर्मिती केली जाणार असल्याचे सूतोवाच शाह यांनी केले.

सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच देशव्यापी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच देशभरातील सहकारी संस्थांना संबोधित केले. इफ्को, सहकार भारती, नाफेड, कृभको  आदी देशभरातील संस्थांनी सहकार संमेलनाच्या आयोजनात भूमिका बजावली आहे. देशभरातील सुमारे दोन हजार प्रतिनिधी संमेलनास उपस्थित होते.

 

सहकाराचा ‘मेकओव्हर’:

देशातील सहकारी संस्थांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी कालबाह्य सहकारी कायदे बदलून नवीन कायद्याची निर्मिती केली जाणार असल्याचे संमेलनात स्पष्ट करण्यात आले. ग्रामीण स्तरावर प्रत्येक गावात प्राथमिक सहकार समिती (पीएसी) स्थापन करण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील. आगामी पाच वर्षात तीन लाख प्राथमिक सहकार संस्था स्थापनेचे उद्दिष्ट आहे. गाव हे युनिट निर्धारित करून दहा गावांची मिळून एक प्राथमिक सहकारी समिती अस्तित्वात येईल.

पारदर्शक व कौशल्यप्रदान:

 सहकार क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तवाची दिशा स्पष्ट करताना अमित शाह यांनी नव्या बदलाचे संकेत दिले. सहकार क्षेत्रातील निवडणुका आणि कर्मचार्‍यांची भरती पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करुन कौशल्याचा परिपूर्ण विकास केला जाईल.

 सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यांशी सहकार्याने वागले जाईल, संघर्षाची भूमिका टाळण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. तसेच संघराज्य संबंधाच्या समन्वयातून सहकारचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

 व्याप्ती सहकाराची:

सहकार क्षेत्राची उपयुक्तता आजही अधिक आहे. भारतातील 51 टक्के गावांमध्ये सहकारी संस्था कार्यरत आहेत.  ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची संख्या 8 लाख 55 हजार आहे. देशात 17 मोठ्या आणि जिल्हास्तरावर 300 छोट्या सहकारी बँका काम करीत आहेत. या बँका शेतकर्‍यांना 29 टक्के कर्ज आणि 35 टक्के खतांचे वितरण करत आहे.

English Summary: new policy in cooperative sector amit shah
Published on: 26 September 2021, 11:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)