राज्यात वाटाणा पिकाचे उत्पादन हे बडोदे, खान्देश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी तापमान १o° ते १८° से तापमानात या पिकाची चांगली वाढ होते. राज्यासह देशातील इतर राज्यातही वाटाणाचे उत्पन्न घेतले जाते. दरम्यान आज वाटाणाच्या दोन नवीन वाणविषयी आपण माहिती घेणार आहोत. या वाणाची लागवड केल्यास आपल्याला भरघोस उत्पन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही. या वाटाणा वाणाच्या झाडाला अनेक फुले येतात, आणि या वाटाणाच्या शेंगाही अधिक लागत असतात.
दोन वाटाणाचे संकरित करुन नवीन वाण
शास्त्रज्ञांनी हा वाण बनविण्यासाठी अनोखा प्रयोग केला आहे. दोन वेगवेगळ्या प्रजातीच्या वाण वीएल -८ आणि पीसी -५३१ ला संकरित करून नवीन वाटाणाचे वाण विकसित करण्यात आले आहे. या नवीन वाणाच्या प्रजातीच्या झाडावर आधी दोन फुले दिसतात. त्यानंतर अधिक फुले याला लागत असतात. प्रत्येक देठात दोनपेक्षा जास्त फुले असतात, त्यामुळे एकाच देठामध्ये जास्त शेंगा वाढतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
काय आहे या वाणाचे नाव
वाटाणाच्या नव्या वाणाला वीआरपीएम ९०१-५ असे नाव देण्यात आले आहे. याच्या एका देठात पाच फुल येतात. वीआरपीएम ९०१-५ च्या शेंगा संकरणामुळे तयार झालेल्या वाणांमध्ये वीआरपीएम-५०१, वीआरपीएम -५०२, वीआरपीएम-५०३, वीआरपीएम-९०१-३ आणि वीआरपीएसईएल-१ च्या पिकांच्या देठातून तीन फूल येत असतात. हे एंटी-ऑक्सीडेंटने भरपूर आहे. वाटाणाचे नवीन वाण वीआरपीएम ९०१-५ हे आरोग्यसाठी फायदेशीर आहे. यात मुबलक प्रमाणात आयरन, जिंक, मॅगझिन, आणि कॉपर आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकारच्या आजारांवर उपायकारक आहे. सामान्य वाटाणाच्या तुलनेत यात अधिक प्रमाणात एंटी-ऑक्सीडेंट आहेत.
लागवडीचा हंगाम
वाटाणा पिकाची वर्षातून दोन हंगामांत लागवड केली जाते. राज्यात हे पीक खरीप हंगामात जून-जुलैमध्ये तसेच हिवाळ्यात ठरते. वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतरच घ्यावे. वाटाणा हे पीक वांगी, कांदा, टोमॅटो,बटाटा, कांदा अशा रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडणा-या पिकांनंतर घेऊ नये. या नवीन वाटाणा वाणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या वाणाचा वाटाणा हा खाण्यासह सौंदर्यांसाठीही उपयोगी आहे. हा एक प्रकारे नॅचरल स्क्रबर आहे. याच्या साहाय्याने आपण चेहऱ्यांचा मसाज करु शकतो. लठ्पणाच्या त्रास आहे त्यांच्यासाठी वाटाणा हा फायदेशीर आहे.
Published on: 30 April 2020, 06:04 IST