News

सांगली: सांगली जिल्हा कृषी महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी ऊर्जा मिळेल. हा महोत्सव राज्याला व जिल्ह्याला दिशादर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव सांगता कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, उपसंचालक सर्जेराव फाळके व सुरेश मगदूम व सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

Updated on 17 January, 2019 7:41 AM IST


सांगली:
सांगली जिल्हा कृषी महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी ऊर्जा मिळेल. हा महोत्सव राज्याला व जिल्ह्याला दिशादर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव सांगता कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, उपसंचालक सर्जेराव फाळके व सुरेश मगदूम व सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा कृषी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यास मदत झाली. महोत्सवातील चचासत्रातून जगातील कृषी विषयक घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना झाली. महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व कृषी संलग्न विभाग, महसूल, पोलीस आणि सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन केले आणि अंमलबजावणीसाठी मेहनत घेतली. त्यामुळेच हा कृषी महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. या महोत्सवास जवळपास साडेपाच लाख शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. यासाठी सर्व संबंधित विभागांनी व स्थापन केलेल्या समित्यांनी समन्वयाने काम केले. त्यामुळेच या महोत्सवाचे नेटके आणि शिस्तबध्द नियोजन होऊ शकले, असे ते म्हणाले.

आत्मा अंतर्गत शेतकरी गट, सेंद्रिय शेती गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या मालाला धान्य महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शनात विक्री करण्यात आली. त्यामध्ये 28 धान्य बोल सेंद्रिय उत्पादने, कडधान्य प्रक्रिया केलेले पदार्थ, गाईच्या शेण व मूत्र पासून तयार केलेले तूप व इतर प्रसाधने इत्यादी विक्रीतून 50 ते 60 लाख रूपयांची उलाढाल झाली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगली यांच्यामार्फत आयोजित कृषि महोत्सव 2019 शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देणारा, स्फूर्ती देणारा ठरला आहे. 

यावेळी स्टॉलधारकांना प्रकल्प संचालक आत्मा सांगली कार्यालयामार्फत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे म्हणाले, शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान देणारा, स्फूर्ती देणारा हा कृषी महोत्सव ठरला आहे. कृषी महोत्सवात सहभागी झालेल्या विविध शासकीय दालने, सूक्ष्म सिंचन व निविष्ठा दालने, कृषी तंत्रज्ञान व अवजारे, ग्राहक उपयोगी वस्तू व धान्य महोत्सव इत्यादी महोत्सवाच्या आयोजनात सहकार्य केलेल्या सर्व विभागांचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे व प्रकल्प संचालक आत्मा बसवराज मास्तोळी यांनी यावेळी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार सुरेश मगदूम यांनी मानले व कृषी महोत्सवाची सांगता संपन्न झाली.

English Summary: New energy for farmers through District Agricultural Festival
Published on: 15 January 2019, 06:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)