News

यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न किती गंभीर स्वरुपात निर्माण झाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. कारण दोन वर्षांपूर्वी राज्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात उसाची लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे साखर आयुक्तालय यांनी केलेल्या अंदाजापेक्षा उसाचे उत्पादन भरपूर प्रमाणात झाले.

Updated on 17 July, 2022 2:10 PM IST

 यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न किती गंभीर स्वरुपात निर्माण झाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. कारण दोन वर्षांपूर्वी राज्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने मराठवाडा तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात उसाची लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे साखर आयुक्तालय यांनी केलेल्या अंदाजापेक्षा उसाचे उत्पादन भरपूर प्रमाणात झाले.

त्यामुळे 15 जून नंतर देखील साखर कारखाने सुरू ठेवावे लागले. तरी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस तोडला न गेल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण देखील बघायला मिळाले होते.

या सगळ्यात प्रकरणातून धडा घेत या वर्षी साखर आयुक्तालयाने ऊस लागवडीचे नोंदणी ई पीक पाहणी अँप वर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नक्की वाचा:IMD ALERT: राज्यातील या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, राज्यात बाकी ठिकाणी पावसाचा जोर ओसरणार

 त्यामुळे ऊस लागवड क्षेत्राचा अचूक नोंद होणार असून साखर हंगामाचे नियोजन देखील तंतोतंत होण्यास यामुळे मदत होणार आहे.

आता जो साखर हंगाम संपला त्यासाठी साखर आयुक्तालयाने 1250 लाख हेक्‍टर ऊस क्षेत्राचा एक अंदाज व्यक्त केला होता. परंतु चांगल्या पावसामुळे प्रत्यक्षात  क्षेत्र 1357 लाख हेक्‍टर झाले.

त्यामध्ये तब्बल शंभर लाख हेक्टरची वाढ झाल्याने मराठवाडा व अन्य काही भागात कारखाने 15 जून पर्यंत सुरू ठेवणे भाग पडले.

नक्की वाचा:Crop Cultivation: मिरची लागवडीत वापरा 'या'पद्धती आणि करा खर्च कमी, मिळवा भरघोस उत्पन्न

त्यामुळे ऊस लागवड क्षेत्राची अचूक व तंतोतंत नोंद व्हावी यासाठी साखर आयुक्तालयाने याबाबतीत सर्व साखर कारखान्यांना एक परिपत्रक जारी केले असून सर्व कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उसाची नोंदणी आता इ पीक पाहणी ॲपवर करावी असे आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच कारखान्याकडे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना देखील ॲप वर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच कारखान्याच्या शेती विभागाने यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना देखील करण्यात आले आहेत. तसेच इ पीक पाहणी अँप वर नोंदणीची सातबारा तील नमुना बारा वर नोंद करून घ्यावी लागणार आहे.

नक्की वाचा:भाजीपाला लागवड: जुलै महिन्यात करा 'या' 5 भाजीपाला पिकांची लागवड आणि कमवा भरपूर पैसा, वाचा सविस्तर माहिती

English Summary: new decision taken by suger commisioner about canecrop registration
Published on: 17 July 2022, 02:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)