Satara News : जरंडेश्वर साखर कारखाना मागील काही दिवसांपासून अफरातफर प्रकरणी चर्चेत आहे. याबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. साताऱ्यात असणाऱ्या या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात आता मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने विशेष नवीन सरकारी वकील नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
या अफरातफर प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्याबाबत काल (दि.३) रोजी न्यायालयात सुनावणी घेतली जाणार होती. पण सरकारी वकील संजना शर्मा यांचे निधन झाले. यामुळे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ईडीला लवकरात लवकर सरकारी वकील नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात ईडीतर्फे एड ॠषभ खंडेलवाल यांनी विशेष सरकारी वकील संजना शर्मा यांचे नुकतेच निधन झाल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. यामुळे २४ नोव्हेंबर पर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
जरंडेश्वर कारखान्याबाबत काय आहेत आरोप?
कारखान्यातील २३५ एकर जमीन, कारखाना, यंत्रे, इमारत बांधकाम इत्यादी मालमत्ता अवैधरीत्या ताब्यात घेऊन आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. यामुळे ईडी कारवाई केली असून याबाबत आरोपपत्रही सादर केले आहे. या प्रकरणात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, काँग्रेसचे नेते रणजीत देशमुख यांच्यासह अनेकांना आरोपी करण्यात आले आहे.
Published on: 04 November 2023, 11:13 IST