News

भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील खरी दौलत ही शेती हीच आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे. शेती येथील मुख्य व्यवसाय असला तरी पशुपालन आणि दुग्ध्यवसाय सुद्धा महत्वाचे जोडव्यवसाय आहेत.

Updated on 13 October, 2022 10:38 AM IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील खरी दौलत ही शेती हीच आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे. शेती येथील मुख्य व्यवसाय असला तरी पशुपालन आणि दुग्ध्यवसाय सुद्धा महत्वाचे जोडव्यवसाय आहेत.

सध्या फक्त शेती करून मुबलक नफा मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग शेतीबरोबरच पशुपालन, कुकुडपालान, दुग्ध व्यवसाय, मत्स्य शेती इत्यादी प्रकारचे जोडव्यवसाय करून आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. जास्तीत जास्त सध्या शेतकरी दुग्ध व्यवसायात आला आहे. तसेच दुधाला योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायात आला आहे. दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकरी बांधव अनेक वेगवेगळ्या जातीच्या गाई आणि म्हैशि चा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे.

हेही वाचा:-आता शासकीय केंद्रावर शेतीमाल खरेदीत व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला बसणार चाप, वाचा सविस्तर

 

 

जास्त दुग्ध उत्पादनासाठी शेतकरी बांधव जर्सी, होस्टेन तसेच मुरहा, गवलारू, दिल्ली, पंढरपुरी या जातीच्या गाई आणि म्हैशीच संगोपन करत आहे. कारण या जातीच्या गाई आणि म्हैस जास्तीत जास्त दूध देण्याची क्षमता असते शिवाय देशी जनावरांच्या तुलनेत जास्त दूध देतात. या जनावरांचे वैशिष्ट्य म्हणजे गाभण राहिल्यानंतर सुद्धा ही जनावरे जास्त दूध देतात. ही जनावरे जास्त काळ दूध देतात त्यामुळे शेतकरी वर्गाला ही जनावरे परवडतात.आपल्या महाराष्ट्र राज्यात गाईच्या 6 तसेच म्हैसीच्या 3 जाती आहेत. तसेच आता म्हशीची पुर्णाथडी जात आणि गायीच्या कठाणी जातीची भर पडली आहे. तसेच सरकारं ने या जातीच्या गाईंची नोंदणी करून घेतली आहे.

हेही वाचा:-यंदा च्या वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता, वाचा कारण.

 

पुर्णाथडी म्हशीची वैशिष्ट्ये काय आहेत?

महाराष्ट्र राज्यातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांमद्ये या जातीच्या म्हैस आढळतात. पश्चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या काठी या म्हैसीचे वास्तव्य आपणास आढळून येते. तसेच या म्हैसिचे मध्यम आकारमान, दुधातील उच्च स्निग्धांश, उत्तम प्रजननक्षमता, कमी व्यवस्थापन खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता पूर्णाथडी म्हशीमध्ये आहे. त्यामुळे लहान आणि मध्यम पशुपालकांची या म्हशीला पसंती आहे.

कठाणी गाईची वैशिष्ट्ये:-
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूरच्या काही भागात ही गाईची जात अढळून येते. येथील भात शेती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे शेतीमध्ये राहण्यासाठी याच जातीच्या बैलाचा वापर केला जातो. या जातीच्या गाई आकाराने लहान असतात आणि रंग हा पांढरा तांबडा असा असतो.

English Summary: New breeds of cow and buffalo found in the state, read in detail
Published on: 13 October 2022, 10:37 IST