नेदरलँड हा एक युरोपियन देश असून जगातील प्रमुख दूध निर्यातदार देशांपैकी एक आहे. जर नेदरलॅंडमधील डेअरी उत्पादनांच्या निर्यातीचा विचार केला तर जवळजवळ 50 हजार कोटी रुपयांची दुग्ध उत्पादनाची निर्यात नेदरलॅंडचीआहे. आता नेदरलँड भारतातील खाजगी तसेच सरकारी संस्थांना मार्गदर्शन करत आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्याच्या साहाय्याने भारतीय शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे आणि त्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी नेदरलॅंडची प्रयत्न चालू असल्याचे नेदरलॅंडचेभारतातील राजदूत मार्टिनवॅनडॅन बर्ग यांनी सांगितले. तसेच नेदरलॅंडमधील काही खाजगी कंपन्या बटाटा आणि भाजीपाला क्षेत्रातील प्रक्रिया तंत्रज्ञान भारतात आणत आहेत.
या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढल्यास परंतु अन्नाची नासाडी देखील कमी होण्यास मदत होईल.
तसेच भारतीय शेतीला पोषक असे बियाणे देखील नेदरलॅंडमधील कंपन्या विकसित करत आहेत. त्यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल. नेदरलँड कडे सध्या बायोमास आणि ग्रीनहाऊस तंत्रज्ञानात वर्चस्व आहे याचा फायदा देखील भारतीय शेतकऱ्यांना होऊ शकतो. नेदरलँडमध्ये प्रति कुटुंब दर पशुधनाच्या संख्येचा विचार केला तर ते भारताच्या तुलनेत जास्त आहे.
म्हणून तेथील डेअरी तंत्रज्ञान भारतीय दुग्ध व्यवसाय छत्र कसे वापरू शकतो यासाठी प्रयत्न चालू आहेत. यासाठी नेदरलॅंडमधील कंपन्या या भारतीय कंपन्या, राज्य आणि केंद्र सरकार तसेच संशोधन संस्थांबरोबर सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी आम्ही केंद्रसरकार सोबत संवाद साधत आहोत असे बर्ग म्हणाले.
(संदर्भ-ॲग्रोवन ई ग्राम)
Published on: 16 December 2021, 02:04 IST