जिल्हा मध्यवर्ती बँक आणि शेतकरी यांचे अतूट नाते आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे आर्थिकपुरवठा आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पूर्ण केला जातो.
याचं प्रत्यंतर सध्या आले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एक एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या हंगामासाठी 579 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला एक महिना देखील पूर्ण होत नाही तोपर्यंत नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने 651 कोटी रुपयांचे कर्ज मंजुरी पत्रके विविध कार्यकारी सेवा संस्थांनी बँकेकडे पाठवले असून 372 कोटी रुपयांची रक्कम देखील बँकेकडून कर्ज वितरणासाठी तालुकास्तरावर वितरित करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जात असून मध्यंतरीच्या काळामध्ये नोटाबंदी झाल्यानंतर बँकेचा आलेख हा घसरतच गेला होता.नोटाबंदीचा नाही तर सरकारची कर्जमाफीची लांबलेली घोषणा, त्यानंतर दीर्घकालीन थकबाकीदारांकडून अडकलेली कोट्यवधींची थकबाकी हीदेखील महत्त्वाची कारणे होती.
कलम 88 च्या चौकशीतून समोर आल्याप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजमेंट अनेक वर्ष च्या संचालकांच्या हाती होते, त्या संचालकांनी वितरीत केलेली कोट्यावधींची अनियमित कर्ज प्रकरणे हा मुद्दादेखील त्यांच्या आलेख घसरण्यास कारणीभूत होता. मागील काही दिवसांपासून नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कठोर कारवाई करत थकबाकी वसुली मोहीम सुरू केली असून ज्या शेतकऱ्यांकडे जास्त काळापासून थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांची वाहन, ट्रॅक्टर्स जप्त करून त्यांचे जिल्ह्यातील विविध तालुक्यात जाहीर लिलाव केले जात आहेत. तसेच बऱ्याच जमिनी जप्त करण्यात आले असून त्यांचे लिलाव देखील केले जात आहेत. या सगळ्या उपाययोजनांमुळे वसुलीचे प्रमाण देखील वाढले आहे. जर नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आतापर्यंतची थकबाकीचा विचार केला तर दोन हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.
वर्षभरापासून विविध प्रकारच्या उपाययोजनांच्या माध्यमातून थकबाकी वसुली वाढवल्याने 14 टक्के थकबाकीची वसुली शक्य झाले आहे. अजूनही बऱ्याच थकबाकी वसूल करणे बाकी असून हे आव्हान बँकेपुढे कायम आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:तरुण शेतकऱ्याची यशोगाथा; इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने केली शेती
नक्की वाचा:Online Cow Dung Bussiness: गायीच्या शेना पासून बनणाऱ्या गोवऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती
नक्की वाचा:अतिशय महत्वाची माहिती! गोबर गॅस प्लांट कसा उभारायचा? याबद्दल घ्या सविस्तर माहिती
Published on: 28 April 2022, 01:46 IST