News

गेल्या दोन-तीन वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे सगळ्याच प्रकारच्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागल्याने विकास सहकारी संस्थेच्या तसेच मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीत लक्षणीय वाढ झाली असून यावर उपाय म्हणून नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदारांना थकबाकी वसूल देण्यासाठी प्रोत्साहनपर बाब म्हणून दिनांक 27 मे 2020 च्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन सुधारित आकर्षक सामोपचार कर्ज परत फेड योजना 2020 राबवण्यासाठी नाबार्ड तसेच सहकार आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन मान्यता देण्यात आली होती व सदर योजनेची अंतिम मुदत दिनांक 30 जून 2021 पर्यंत होती.

Updated on 27 August, 2021 9:42 AM IST

परंतु यानंतरही जिल्हाभरातील आणि संस्थांनी तसेच सभासदांनी ही सामोपचार परतफेड योजना परत सुरु करावी याबाबतची मागणी केल्यामुळे बँकेनेही असलेल्या थकबाकीचे कालनीहाय व रक्कम निहाय वर्गवारीचा तसेच मोठ्या प्रमाणातील एनपीएचा विचार करुन सदरची आकर्षक सामोपचार  कर्ज परतफेड योजनेस

दिनांक 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून दिनांक 30 जून 2016 अखेर थकबाकीत असलेल्या सभासदां करिता आकर्षक सामोपचार योजना जाहीर केली असून जास्तीत जास्त पात्र थकबाकीदार यांनी जास्तीत जास्त पात्र थकबाकीदारांना सदर योजनेत भागघेण्यासाठी आपल्या संबंधित शाखेत संपर्क करावा असे आवाहन बँकेने केले आहे.

 जे सभासद  दिनांक 30 जून 2017 अखेर थकबाकीत असतील त्यांच्याकडील थकबाकी भरण्यासाठी 

 त्यांच्या थकखात्यावर होणाऱ्या व्याजात चार टक्के सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. दिनांक 30 जून 2016 अखेरीस विविध कार्यकारी संस्था पातळीवर थकित असलेले सर्व प्रकारचे शेती व शेतीपूरक (अल्पमुदत,मध्यम मुदत, दीर्घ मुदत ) संपूर्ण येणे कर्ज व बँकेमार्फत वितरित केलेल्या थेट कर्ज पुरवठा योजनेअंतर्गत थकित असलेले सर्व थकबाकीदार सभासद या योजनेस पात्र राहतील.

English Summary: ndcc bank announce extend date for return debt
Published on: 27 August 2021, 09:42 IST