News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या छातीला मार लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांचे अपघात घडत असल्याचे दिसून येत असताना आता हा अपघात झाला आहे. रात्रीच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

Updated on 04 January, 2023 11:48 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या छातीला मार लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांचे अपघात घडत असल्याचे दिसून येत असताना आता हा अपघात झाला आहे. रात्रीच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

याबाबत त्यांनी स्वता फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. मुंडे हे मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परत जात होते. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात त्यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे.

बारामतीत सुरू होतेय नवीन कृषिपर्व! वॉशिंग्टन नंतर जगातील दुसरे संशोधन केंद्र बारामतीत, शरद पवार, ऑक्सफर्डचे संचालक उपस्थित

माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असेही ते म्हणाले.

वीज कनेक्शन खंडीत केल्याने शेतकऱ्याने लाईव्ह व्हिडीओ करत घेतलं विष, घटनेने राज्यात खळबळ..

भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा देखील काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. तसेच शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे देखील काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले होते.

महत्वाच्या बातम्या;
आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा, शेतकरी चिंतेत..
वाहने 150 च्या स्पीडने जात आहेत, टोलमधून करोडोची कमाई, पण समृद्धी महामार्गावर काम केलेल्या तीनशे मजुरांना 5 महिन्यापासून वेतन नाही
आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, सौर ऊर्जा प्रकल्पाना दिली चालना...

English Summary: NCP leader Dhananjay Munde's car accident
Published on: 04 January 2023, 11:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)