News

मुंबई: नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू झाले आहे. बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथे 20 ट्रक आणि थेट मुंबई शहरात 12 ट्रक भाजीपाला पुरवठा झाला आहे तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 31 ट्रक भाजीपाला आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे या शहरात भाजीपाल्याची टंचाई नाही. ग्राहकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पणन विभागाने केले आहे.

Updated on 27 March, 2020 9:03 AM IST


मुंबई:
नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू झाले आहे. बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथे 20 ट्रक आणि थेट मुंबई शहरात 12 ट्रक भाजीपाला पुरवठा झाला आहे तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 31 ट्रक भाजीपाला आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे या शहरात भाजीपाल्याची टंचाई नाही. ग्राहकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पणन विभागाने केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामगार बाजार समितीमध्ये कामावर येऊ शकत नव्हते आणि शेतमाल पुरवठा करणाऱ्या वाहनांना ये-जा साठी अडचणी येत होत्या. आता शेतमाल घेऊन ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना सुद्धा विशेष पास देण्यात येत आहेत. त्यामुळे आता शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनाला अडचणी नाहीत.

बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करत असतात त्याच्या सुरक्षिततेसाठी व तिथे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु झाली होणार आहे. शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घेऊन यावा.

English Summary: Navi Mumbai and Pune Agricultural produce Market Committee started functioning
Published on: 27 March 2020, 09:03 IST