सध्या शेतात रासायनिक खतांचा अतिवापर वाढला आहे. याचा थेट परिणाम हा जमिनीवर, उत्पन्नावर आणि आरोग्यावरही होत आहे. रासायनिक घटकांचा कमीत कमी वापर व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. लवकरात लवकर शेतातून उत्पादन मिळावे, कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावे यांसारख्या बऱ्याच कारणांनी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे.
मध्यंतरी आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, पंतप्रधानांनी मार्च 2022 मध्ये गुजरात पंचायत महासंमेलनात केलेल्या भाषणात प्रत्येक गावातील किमान 75 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जुलै 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता एका नैसर्गिक शेती परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.
गुजरात पंचायत महासंमेलनात केलेल्या भाषणात पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने मार्गदर्शन करून, सुरत जिल्ह्याने जिल्ह्यातील शेतकरी गट, निवडून आलेले प्रतिनिधी, तलाठी, कृषी उत्पन्न पणन समित्या (APMC), सहकारी, बँका इत्यादी विविध भागधारक आणि संस्थांना संवेदनशील आणि प्रेरित करण्यासाठी एकत्रित आणि समन्वित प्रयत्न केले. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मदत करा असेही त्यावेळी सांगितले होते.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...
परिणामी, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 75 शेतकरी निवडले गेले आणि त्यांना नैसर्गिक शेती करण्यास सहाय्य केले तसेच त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांना 90 वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये प्रशिक्षित करण्यात आले. तसेच जिल्हाभरातील 41,000 हून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
ही परिषद सुरत, गुजरात येथे आयोजित केली जात आहे आणि त्यात हजारो शेतकरी आणि इतर सर्व भागधारकांचा सहभाग असेल ज्यांनी सुरतमध्ये यशस्वीपणे नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे, या कॉन्क्लेव्हला गुजरातचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बकरी ईद निमित्त ताजमहलमध्ये जाणारांसाठी आनंदाची बातमी, प्रशासनाचा निर्णय..
'ड्रॅगन फ्रूट' लागवडीवर राष्ट्रीय परिषद आयोजित; क्षेत्रफळ वाढवण्यासाठी ५ वर्षांचे धोरण विकसित
Published on: 09 July 2022, 03:48 IST