काल शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडल्याची घोषणा केली. आता शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद अचानक सोडल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. पण राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पवार कुटुंबियांकडून थेट घोषीत केला जाणार नाही, तर यासाठी नेमलेली समिती याबाबत निर्णय घेणार आहे.
असे असताना शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर याची घोषणा होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे सुप्रिया सुळे यांचा कर्नाटक दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.
सध्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही सुरु आहे. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांकडूनही कळतं आहे. त्यामुळं आता आजच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोचा' चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार, ११ ते १५ मे पाऊस पडणार
सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात आहे. कारण त्यांचा देशपातळीवरील इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क तसेच संवादही चांगला आहे. दिल्लीत जाऊन त्यांना बरीच वर्ष झाली आहेत. यामुळे देशपातळीवरील नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे.
पाऊस घेणार विश्रांती, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाब डख यांनी सांगितली तारीख
नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन चार नावं प्रामुख्यानं घेतली जात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. यामुळे आता कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खजूर शेती आहे खूपच फायद्याची, खजुराचे एक झाड देते हजारो रुपयांचे उत्पन्न, शेतकरी काही वर्षात करोडपती
कर्नाटकमध्ये मोफत सिलेंडर, व्याजमुक्त कर्ज, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?
किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
Published on: 03 May 2023, 12:15 IST