News

२४ सप्टेंबर, शनिवार रोजी कृषी महाविद्यालय अकोला

Updated on 26 September, 2022 4:42 PM IST

२४ सप्टेंबर, शनिवार रोजी कृषी महाविद्यालय अकोला येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला.राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना 24 सप्टेंबर सन 1969 म्हणजेच गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षाला करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवेची व समाजसेवेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली.या ओजस्वी दिनाचे औचित्य साधून सकाळी ८ वाजता महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदान करून

स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.After that the program was organized at 11 o'clock. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना गीतानी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी एकसुरात राष्ट्रीय सेवा योजना गीत गायले.

हे ही वाचा - लंपी त्वचा रोगाबद्दल कृषी विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे सर यांनी भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन. एम. काळे सर, डॉ. धुळे सर, डॉ. भगत सर,

डॉ. वऱ्हाडे सर, डॉ. साजिद सर, डॉ. चिकटे मॅडम, डॉ. गायकवाड मॅडम, डॉ. कनसे मॅडम, सारिका मोरे मॅडम, अरुणा काठोले मॅडम आणि श्री अजय धोंडगे सर उपस्थित होते. डॉ. प्रकाश नागरे सरांनी विद्यार्थ्याना आपलं जीवन लोकांसाठी कस वाहून नेता येईल आणि सुखकर करता येईल या विषयावर मार्गदर्शन करून *"not me but you"* या ब्रीदवाक्याचे महत्व पटवून दिले. तसेच महाविद्यालयाचे कार्यक्रम

अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यानंतर श्री गोरक्षण संस्था अकोला येथे भेट देऊन त्यांच्याकडून सध्या वेगाने पसरत असणाऱ्या लंपी रोगाविषयी माहिती घेण्यात आली. तिथे विद्यार्थ्यांना गायींच्या संगोपणाविषयी आणि प्रजातींविषयी माहिती मिळाली. अशा विविध उपक्रमांनी कृषी महविद्यालय अकोला येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

English Summary: National Service Scheme Day celebrated at Agriculture College Akola
Published on: 25 September 2022, 09:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)